रश्मिकाच्या समर्थनार्थ अभिनेते सरसावले!

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

रश्मिकाच्या समर्थनार्थ अभिनेते सरसावले!

अभिनेत्री रश्मिका हिचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. स्वतः रश्मिकाने हा व्हिडीओ पाहून आपल्याला धक्का बसला असल्याचे सांगून लवकरात लवकर याबाबत कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. तिच्या समर्थनार्थ ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चनसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नाग चैतन्य हा अभिनेताही सरसावला आहे.

अभिनेता नाग चैतन्य याने तंत्रज्ञानाचा असा गैरवापर होत असल्याबद्दल नराजी व्यक्त केली असून असे कृत्य करणाऱ्यावर कठोर कारवाईची आणि यासाठी एखादा नवा कायदा करून त्याच्या अंमलबजावणीची मागणी केली आहे.
अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचा डीपफेक व्हिडीओ नुकताच तयार करण्यात आला आहे. डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करून तिचा चेहरा ब्रिटिश भारतीय अभिनेत्री झारा पटेलच्या मूळ व्हिडीओवर मॉर्फ करण्यात आला आहे. या व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. स्वतः रश्मिका हिनेही हे अतिशय भीतीदायक असल्याचे सांगून लवकरात लवकर कारवाईची मागणी केली आहे.

हे ही वाचा:

दापोलीतील वादग्रस्त साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश

बॉडी बॅग खरेदी घोटाळयाप्रकरणी किशोरी पेडणेकरांना ईडीकडून समन्स

छत्तीसगडमध्ये मतदानादरम्यान स्फोट

नेपाळमध्ये ५.६ रिश्टर स्केल भूकंपाच्या धक्क्यात आठ हजार घरांचे नुकसान!

रश्मिकाच्या या डीपफेक व्हिडीओबद्दल हिंदी चित्रपटसृष्टीतून पहिल्यांदा अमिताभ बच्चन यांनीच याबाबत आवाज उठवला. त्यांनी हा व्हिडीओ बनवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर अभिनेते नाग चैतन्य यांनीही अभिनेत्री रश्मिका हिच्या समर्थनार्थ पोस्ट ‘एक्स’वर पोस्ट केली. ‘तंत्रज्ञानाचा असा गैरवापर करणे हे अतिशय खेदजनक आहे. भविष्यात आणखी काय वाढून ठेवले आहे, याचा विचार मनात येऊन आणखी भीती वाटते. यावर ताबडतोब कारवाई केली पाहिजे आणि नागरिकांचे रक्षण करण्यासाठी नव्या कायद्याच्या अंमलबजावणीची गरज आहे,’ अशी मागणी त्याने केली.
रश्मिका हिने सोमवारी या व्हिडीओमुळे आपण दुखावलो गेलो असल्याचे सांगत कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच, या अवघड प्रसंगात तिच्या पाठिशी उभे राहणारे तिचे कुटुंब, मित्रपरिवार आणि हितचिंतकांचे तिने आभार मानले आहेत.

Exit mobile version