ग्रँडस्लॅम टेनिस विश्वात २२ विजेतीपदे जिंकणारा स्पेनचा टेनिसपटू रफाएल नदाल याने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. २०२४ हे आपले व्यावसायिक टेनिसमधील अखेरचे वर्ष असेल असे त्याने जाहीर केले आहे.
मलोरका येथे पत्रकार परिषदेत त्याने ही घोषणा केली. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतून आपण माघार घेत असल्याचे त्याने जाहीर केले. २००५ मध्ये त्याने फ्रेंच ओपनमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून त्याने १४ वेळी स्पर्धा जिंकली. पण या कालावधीत तो प्रत्येक स्पर्धा खेळला.
सातत्याने झालेल्या दुखपतींमुळे आपण हा निवृत्तीचा निर्णय घेत आहोत. मांडीच्या दुखपतीमुळे जानेवारी महिन्यात मला ऑस्ट्रेलियन ओपनमधून माघार घ्यावी लागली होती, असे नदाल म्हणाला.
सध्या परिस्थिती अशी आहे की मी माझ्या दैनंदिन कामाचा आनंदही घेऊ शकत नाही. कोरोनानंतर मी सराव आणि स्पर्धा या दोन्हीत फारसा रमत नव्हतो. त्यामुळे मी काही काळ थांबू इच्छितो. कदाचित २ महिने किंवा ४ महिने, असेही नदालने सांगितले.
नदाल म्हणाला की, जे काही मी करतो आहे ते, माझ्या शरीरासाठी आणि माझ्या वैयक्तिक आनंदासाठी करतो आहे. पण आता थांबावे असे वाटते आहे. ज्या स्पर्धांवर आपण मनस्वी प्रेम केले त्यांना योग्य पद्धतीने मला निरोप द्यायचा आहे. त्यामुळे आताच एखादा निर्णय घेऊन मी त्यापासून वंचित राहू इच्छित नाही.
हे ही वाचा:
वाघ, वाजे, वज्रमुठीवरू न फडणवीसांची टोलेबाजी
हिंदू तरुणाची द भोपाळ स्टोरी; झाला सौरभचा सलीम
उद्धव ठाकरेंचे व्यक्तिगत चांगले संबंध किती जणांशी? बुरे दिन यालाच म्हणतात..
नाद एकच; बैलगाडा शर्यतीला सुप्रीम कोर्टाचा हिरवा कंदील !
पुढील वर्षी फ्रेंच ओपननंतर निवृत्त होणार का, यावर नदाल म्हणतो की, असे मी सांगू शकत नाही पण मला ऑलिम्पिकमध्ये स्पेनचे प्रतिनिधित्व करायचे आहे. नदालने २००८मध्ये एकेरीत तर २०१६मध्ये दुहेरीत ऑलिम्पिक सुवर्ण जिंकले आहे.