आरआरआर हा सिनेमा देशातच नव्हे तर परदेशातही प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावल्यानंतर आता या सिनेमाने जगभरातील सिनेमांना मागे टाकत क्रिटिक्स चॉइस अवॉर्डवर आपले नाव कोरले आहे. आरआरआर हा परदेशी भाषेतील सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरलाय. तसेच नाटू-नाटू या गाण्यालाही सर्वोत्कृष्ट ओरिजनल गाण्याचा पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. या पुरस्कारामुळे एसएस राजामौली यांनी दिग्दर्शित केलेल्या आरआरआर सिनेमाचा डंका जगभरात वाजत आहे.
या घोषणेनंतर सिनेमाच्या कलाकारांवर कौतुकाचा वर्षाव होतोय. सिनेमाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा पुरस्कार विराजमान झाला आहे. हा पुरस्कार म्हणजे सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील श्रेणीत सिनेमाला समीक्षकांचा पुरस्कार मिळालेला आहे.
हेही वाचा :
छोटा राजनच्या वाढदिवसाचा केक बाधला
प्रजासत्ताक दिनावर दहशतवादी हल्ल्याचे सावट
मुश्रीफ यांच्या खात्यात ५० कोटी कसे जमा झाले?
क्रिटिक्स चॉइस यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून प्रेक्षकांना ही बातमी देण्यात आली. त्यांनी ट्वीट केले आहे की, आरआरआर या सिनेमातील कलाकार आणि या सिनेमाचा भाग असलेल्या प्रत्येकाचे अभिनंदन. बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्मसाठी क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड जिंकला आहे. आरआरआर या सिनेमात अजय देवगण, आलिया भट्ट, श्रीया सरन यांनी भूमिका साकारल्या आहेत. आरआरआरने अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात या सिनेमाने बाजी मारली आहे.
आरआरआरसोबत अर्जेंटिना १९८५, ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, फॉल्स क्रॉनिकल ऑफ अ हँडफुल ट्रुथ्स, बार्डो, डिसिजन टू लीव्ह आणि क्लोज हे सिनेमे स्पर्धेत होते. पण या सर्व सिनेमांना धूळ चारत आरआरआर सिनेमाने सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळवला आहे.