एन. व्ही. रमणा होणार भारताचे नवे सरन्यायाधीश

एन. व्ही. रमणा होणार भारताचे नवे सरन्यायाधीश

सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश शरद बोबडे पुढील महिन्यात २३ एप्रिल रोजी निवृत्त होणार आहेत. त्यापूर्वी केंद्र सरकारने त्यांना पुढील सरन्यायाधीशांच्या नावाची शिफारस करण्यास सांगितलं होतं. शरद बोबडे यांनी न्यायमूर्ती एन.व्ही. रमणा यांच्या नावाची शिफारस केंद्रीय कायदा मंत्रालयाला केली आहे.

सरन्यायाधीश शरद बोबडे पुढील महिन्यात २३ एप्रिलला सेवानिवृत्त होणार आहेत. केंद्रीय कायदा मंत्रालयानं सरन्यायधीश निवडीची प्रक्रिया सुरु केली आहे. केंद्र सरकारनेच शरद बोबडे यांना पुढील सरन्यायाधीशांच्या नावाची शिफारस करण्यासाठी सुचवलं होते. कायदा मंत्रालायाला प्रतिसाद देत बोबडे यांनी न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा यांच्या नावाची शिफारस केली आहे. केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहीले होते.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारवर नाराज पोलिसाची, इच्छा मरणाची मागणी

शिवसेनेवर काँग्रेसने केला ८०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप

केंद्र सरकारचा मराठा आरक्षणाला पाठिंबा

संजय राऊत सारखा पलटी मास्टर दुसरा नाही

न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा हे सरन्यायधीश शरद बोबडे यांच्यानंतर सुप्रीम कोर्टातील सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत. नुथुलापटी वेंकट रमणा यांचा जन्म २७ ऑगस्ट १९५७ रोजी झाला होता. न्यायमूर्ती रमणा यांना एक वर्ष चार महिने इतका कार्यकाळ मिळणार आहे. २६ ऑगस्ट २०२२ ला ते सेवानिवृत्त होतील. रमण्णा हे आंध्र प्रदेशातील शेतकरी कुटुंबातील आहेत. जून २००० मध्ये त्यांची आंध्र प्रदेशच्या हायकोर्टात कायमस्वरुपी न्यायमूर्ती म्हणून निवड झाली होती. त्यानंतर त्यांनी दिल्ली हायकोर्टात मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम केले. सुप्रीम कोर्टात २०१४ पासून ते कार्यरत आहेत.

रमणा यांच्यानंतर न्यायमूर्ती चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होतील.

Exit mobile version