रामभक्तांसाठी मोठी बातमी समोर येत आहे.रामलल्लाची मूर्ती बनवण्याची प्रतीक्षा आता संपली आहे. म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज कर्नाटकातून आणलेल्या शिळेवर राम मंदिरातील रामाची मूर्ती तयार करणार आहेत. भगवान श्रीरामाची मूर्ती तयार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली आहे. त्यामुळे लवकरच रामलल्ला अयोध्या राम मंदिराच्या गर्भगृहात विराजमान होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२४ मध्ये प्रभू राम त्यांच्या मूळ गर्भगृहात विराजमान होणार आहेत.
राम मंदिराच्या उभारणीसंदर्भात मंदिर ट्रस्टची दोन दिवसीय अनौपचारिक बैठक झाली. या बैठकीत राम मंदिरातील प्रभू रामललांच्या अभिषेक संदर्भात विचारमंथन झाले. याआधी समितीने रामजन्मभूमी संकुल आणि रामसेवकपुरमची पाहणी केली. प्राणप्रतिष्ठेसाठी जाणकारांकडून अभिप्राय मागविण्यात आल्याची माहिती ट्रस्टतर्फे देण्यात आली आहे. रामलल्लाची मूर्ती बनवण्याचा निर्णयही घेण्यात आला असून, त्यासाठी मूर्तिकार अयोध्येत पोहोचले आहेत.
अलीकडेच नेपाळमधून अयोध्येत आणलेल्या शाळीग्रामपासून श्रीरामाची मूर्ती घडवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते. पण आता कर्नाटकातील म्हैसूरहून येथून आणलेल्या श्यामल कृष्ण शिळेपासून एरीरमाची मूर्ती घडवण्यात येणार असल्याचे बनवला जाणार असल्याचे श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य विश्व तीर्थ प्रसन्नाचार्य यांनी सांगितले.
या बैठकीत ट्रस्टचे खजिनदार गोविंददेव गिरी, राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय, उडुपी पीठाधीश्वर विश्व तीर्थ प्रसन्नाचार्य, कामेश्वर चौपाल, अयोध्या राजा विमलेंद्र मोहन मिश्रा, डॉ. अनिल मिश्रा, नीरेंद्र महेंद्रसिंग उपस्थित होते. .
हे ही वाचा:
राज्यातील शाळेची घंटा १५ जूनला वाजणार
राज्याच्या कारागृहातील कैद्यांवर असेल आता ड्रोन कॅमेऱ्यांची करडी नजर
तब्बल दीडशे सीसीटीव्ही फुटेज तपासले, तेव्हा सापडला मंगळसूत्र चोर
जानेवारीमध्ये मूर्तीवर अभिषेक
सध्या समाधानकारक काम सुरू असून, मंदिराच्या छताचे मोल्डिंगचे काम जूनपर्यंत पूर्ण होईल. सूर्य उत्तरायणात येताच जानेवारी २०२४ मध्ये मंदिरात श्रीरामावर अभिषेक करण्यासाठी ज्योतिषी विद्वानांशी चर्चा केली करण्यात येत आहे. या कालावधीत कोणत्या प्रकारचे उत्सव होणार, याची तयारी मे महिन्यात होणाऱ्या बैठकीत होणार आहे असे विश्व तीर्थ प्रसन्नाचार्य यांनी सांगितले.
कशी असेल रामाची मूर्ती
मूर्ती कशी बनवणार, यासाठी सर्व चित्रे गोळा करून अंतिम रूप देण्यात आले आहे. चेहऱ्यावर गोड स्मित आणि हातात धनुष्य असलेली ही मूर्ती असेल. कर्नाटकातील केरकर आणि हिग्रेवणकोटे गावातून आणलेल्या दगडांनी ही मूर्ती तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज मूर्ती बनवण्यासाठी अयोध्येत पोहोचले असल्याची माहिती प्रसन्नाचार्य यांनी दिली.