घरच्या घरी कोरोना टेस्ट करण्याचे किट तयार केलेल्या मायलॅब या कंपनीने एका आठवड्याला एक कोटी किट बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठीची तयारी करण्यास देखील कंपनीने प्रारंभ केला आहे. येत्या चार-सहा आठवड्यात हे लक्ष्य गाठण्याचे नक्की केलं आहे.
लस उत्पादनक सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे (एसआयआय) संस्थापक आदर पुनावाला यांच्या पाठिंब्याने मायलॅब या उत्पादनाला सुरूवात करत आहे. सध्या सुरूवात सत्तर लाख किटच्या उत्पादनाचे लक्ष्य ठेवले आहे. त्यानंतर पुढील काही दिवसांनी कंपनी या किटच्या पुरवठ्याला देखील सुरूवात करेल.
हे ही वाचा:
देशात पाच हजार पेक्षा जास्त काळ्या बुरशीचे रुग्ण
वडेट्टीवारांना ओबीसी नेता होण्याची घाई, त्यांच्या बोलण्याला काडीचीही किंमत नाही
मराठा मूक मोर्चा आता ‘बोलका’ होणार?
मायलॅब कंपनीचे प्रमुख संस्थापक राहुल पाटिल यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या दोन आठवड्यात ही क्षमता वाढवून एक कोटी किट पर्यंत वाढवण्यात येईल. त्यांनी सांगितले की, कोणतेही तांत्रिक ज्ञान नसलेला माणूस देखील या किटचा वापर करण्यास सक्षम असेल. त्याबरोबरच हा कीट गाव-खेड्यापर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा निर्धार आहे.
कंपनीच्या या किटच्या चाचणीला गेल्या आठवड्यात आयसीएमआरची मान्यता लाभली होती. या चाचणीत पॉजिटिव्ह आढळलेल्या रुग्णाला कोरोनाबाधित मानून त्यानुसार उपचार केले जाणार आहेत. या किटच्या वापराला आयसीएमआरने काही अटी-शर्थींसह मान्यता दिली आहे.