तो पाच दिवस इमारतीच्या ढिगाऱ्याखाली जिवंत होता…

म्यानमारचा भूकंप, मृतांचा आकडा ३ हजार पार

तो पाच दिवस इमारतीच्या ढिगाऱ्याखाली जिवंत होता…

म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपानंतर तेथील परिस्थिती बिकट आहे. सर्वत्र ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. सुरक्षा दलांकडून बचावकार्य मोहीम सुरु आहे. याच शोधमोहिमे दरम्यान, बचाव पथकाने ५ दिवसांनी ढिगाऱ्यातून एका व्यक्तीला जिवंत बाहेर काढले आहे. म्यानमारची राजधानी नायपिदाव येथील एका हॉटेल इमारतीच्या ढिगाऱ्याखाली हा २६ वर्षीय तरुण गाडला गेला होतो. बचाव पथकाने त्याला बाहेर काढले, जेव्हा तो जिवंत असल्याचे पाहताच सर्वजण आश्चर्यचकित झाले. ढिगाऱ्यातून बाहेर काढताच त्याला ताबडतोब उपचारासाठी नेण्यात आले.

वृत्तसंस्था एएफपीच्या बातमीनुसार, देशाच्या अग्निशमन सेवा आणि तुर्की बचाव कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाला राजधानी नायपिदावमधील एका हॉटेल इमारतीच्या अवशेषात एक २६ वर्षीय पुरूष जिवंत सापडला. म्यानमारचे लष्करी शासक मिन आंग ह्लाईंग म्हणाले की, मानवतावादी संस्थांनी इतर देशांना मान्सूनच्या पावसापूर्वी मदत वाढवण्याचे आवाहन केले आहे. मे महिन्यात मान्सूनचे आगमन होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, म्यानमारमध्ये झालेल्या शतकातील सर्वात भीषण ७.७ तीव्रतेच्या भूकंपात आतापर्यंत जवळपास ३००० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ४५२१ हून अधिक जण जखमी झाले आहेत आणि ४४१ जण अजूनही बेपत्ता आहेत. अधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : 

ममतांबद्दल दया माया नाही; शिक्षक भरती प्रक्रिया रद्दच, ‘सर्वोच्च’ शिक्कामोर्तब!

गुजरातमध्ये कोसळलेल्या हवाई दलाच्या विमानातील जखमी पायलटचा मृत्यू!

ट्रम्प यांच्याकडून भारतासह १८५ देशांवर परस्पर शुल्काची घोषणा; कोणता देश किती भरणार कर?

बिश्नोई टोळीशी संबंधित पाच जणांना अंधेरीतून ठोकल्या बेड्या

‘बेपत्ता झालेल्यांपैकी बहुतेक जण मृत असल्याचे मानले जात आहे. ७२ तासांहून अधिक काळ लोटला असल्याने त्यांना जिवंत राहण्याची शक्यता कमी आहे,’ असे देशाच्या लष्करी जंटाचे नेते जनरल मिन आंग ह्लाईंग यांनी दूरचित्रवाणीवरील भाषणात सांगितले.

Exit mobile version