भारतीय सीमेलगत म्यानमारचा हवाई हल्ला!

बंडखोरांच्या तळांना केलं लक्ष

भारतीय सीमेलगत म्यानमारचा हवाई हल्ला!

भारताच्या सीमेलगत लागून असलेल्या बंडखोरांच्या ठिकाणांवर म्यानमारने हवाई हल्ला केला आहे.त्यानंतर मिझोराममध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला.या हवाई हल्ल्यांमध्ये किती बंडखोर मारले गेले याची माहिती अद्याप पुढे आली नाही. या बंडखोरांनी भारत-म्यानमार सीमेवर आपले तळ ठोकले होते. ज्यावर म्यानमारच्या हवाई दलाने हल्ले केले आहेत.खरे तर सध्या म्यानमारमधील परिस्थिती बिकट होत चालली आहे.म्यानमार मधील लष्कराला हे बंडखोर गट सातत्याने आव्हान देत आहेत.म्यानमारमध्ये लष्करी राजवट आहे. तेथील सैन्याला जंता असेही म्हटले जाते.हे बंडखोर लष्करी राजवटीला सातत्याने आव्हान देत आहेत.

भारताच्या सीमेवर म्यानमारचे लष्कर आणि बंडखोर संघटनांमध्ये रविवारी रात्रीपासून गोळीबार सुरू आहे. यानंतर शेकडो म्यानमारचे नागरिक सीमेजवळ आश्रय घेण्यासाठी उभे आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्यानमार आर्मी आणि चायनालँड डिफेन्स फोर्स (CDF) कॅडरमध्ये गोळीबार सुरू झाला.

म्यानमारच्या लष्कराशी स्पर्धा करण्यासाठी या संघटनेची स्थापना २०२१ मध्ये करण्यात आली होती.चंफईचे उपायुक्त जेम्स लालरिंचन यांनी सांगितले की, रविवारी संध्याकाळपासून गोळीबार सुरू आहे.गोळीबाराचा प्रकार रविवारी रात्री पासून सुरु झाला असून सोमवारी सकाळी संपला.तसेच आंतरराष्ट्रीय सीमेजवळ बॉम्ब टाकण्यात आल्याचेही वृत्त आहे पण त्यात भारताचे कोणतेही नुकसान झाले नाही.

हे ही वाचा:

होमस्टेमधील एका महिला कर्मचाऱ्याला दारू पाजून केला सामूहिक बलात्कार!

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी आठ संघ झाले पात्र

हैदराबाद येथील एका निवासी इमारतीला आग, ९ जणांचा मृत्यू!

राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर अयोध्या स्थानकाचाही कायापालट

मिळालेल्या माहितीनुसार, म्यानमारच्या हवाई दलाने मिझोरामसह देशाच्या सीमावर्ती गावांवर बॉम्बफेक केल्यानंतर सुमारे १,४०० म्यानमारचे लोक, ज्यामध्ये बहुतेक स्त्रिया आणि मुले आहेत.आपल्या जीव वाचण्यासाठी यांनी मिझोरामच्या चांफई जिल्ह्यात आश्रय घेतला आहे .

या संदर्भांत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे जिल्हा संघटक व्हीएल ह्रुआमाविया यांनी सांगितले की, हेलिकॉप्टरच्या साहाय्याने म्यानमारने केलेल्या गोळीबारात एका निर्वासिताचा मृत्यू झाला असून अन्य १७ जण जखमी झाले आहेत.२०२१ पासून या जिल्ह्यात ५,६०० म्यानमेरी निर्वासित आहेत.संपूर्ण राज्यात असे सुमारे ३०,००० निर्वासित आहेत.

 

 

 

Exit mobile version