माझा पुढचा जन्म बहुधा बंगालमध्ये होईल…

ममता बॅनर्जींवर हल्लबोल करताना पंतप्रधानांचे वक्तव्य

माझा पुढचा जन्म बहुधा बंगालमध्ये होईल…

एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान आज सुरु आहे तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालमधील मालदा दौऱ्यावर आहेत.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर सभेला संबोधित करताना टीएमसी पक्षावर जोरदार टीका केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये टीएमसी घोटाळे करत आहे तर भाजप बंगालच्या विकासासाठी काम करत आहे.ते पुढे म्हणाले की, तुम्ही लोक इथे अडचणीत आहात यासाठी मी तुमची माफी मागतो.बंगालवर प्रेम व्यक्त करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, मला असं वाटतं की, माझा मागील जन्म बंगालमध्ये झाला होता किंवा माझा पुढचा जन्म इथेच होणार आहे.

टीएमसी पक्षावर टीका करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, इथे फक्त घोटाळे होतात बाकी काही होत नाही.शिक्षक घोटाळा, राशन घोटाळा सर्व काही इथेच सुरु असल्याचे मोदींनी सांगतले.ते पुढे म्हणाले की, आम्ही दिल्लीहून बंगालच्या लोकांना जे पैसे पाठवतो ते टीएमसीच्या सावकारांनी रोखले आहे.हे लोक ते पैसे खातात.या लोकांनी आयुषमान योजना बंद केली.याशिवाय आम्ही पीएमसी किसान सन्मान निधी अंतर्गत बंगालच्या शेतकऱ्यांना ८००० कोटी रुपये पाठवले आहेत.हे देखील बंगालच्या टीएमसी सरकारने थांबवले आहेत.

हे ही वाचा:

‘सुळसुळीत वचननामा आणि बुळबुळीत वचने’

पॅलेस्टाईन समर्थक आंदोलनात भाग घेतल्याबद्दल भारतीय विद्यार्थिनीला अटक

दिल्ली विमानतळावर फिरत होता सिंगापूर एअरलाईन्सचा बनावट पायलट!

बॅलेट पेपर नाही; ईव्हीएमवरच होणार निवडणुका!

ते पुढे म्हणाले की, टीएमसीने महिलांचे अधिक नुकसान केले आहे.मुस्लिम महिलांना न्याय मिळावा म्ह्णून आम्ही तिहेरी तलाक रद्द केला. पण टीएमसी सरकार याच्या विरोधात होते.याशिवाय संदेशखळी येथील महिलांवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला सरकारने वाचवण्याचा प्रयत्न केला.

Exit mobile version