‘माझा तुरुंगवास स्वातंत्र्य चळवळीसारखा’

जामिनावर सुटका झालेले अरविंद केजरीवाल यांची मखलाशी

‘माझा तुरुंगवास स्वातंत्र्य चळवळीसारखा’

‘माझा तुरुंगवास एका स्वातंत्र्य चळवळीसारखा होता. ज्या प्रकारे अनेक जण देशाच्या स्वातंत्र्यासाठी दीर्घकाळ तुरुंगात राहिले, त्याप्रमाणे देशाच्या लोकशाहीचा बचाव करण्यासाठी, राज्यघटनेचे संरक्षण करण्यासाठी आम्ही तुरुंगात जात आहोत. मी भ्रष्ट आहे म्हणून तुरुंगात गेलो नाही, सिसोदियाने काही चुकीचे केले म्हणून ते आत नाहीत. भाजपला वाटते की आम्ही त्यांना घाबरून राहावे, सर्वांनी त्यांच्यापासून घाबरून राहावे, अशी त्यांची इच्छा आहे. मात्र कोणत्याही लोकशाहीत लोकांचे म्हणणे ऐकून घेणे अधिक योग्य असते,’ अशा शब्दात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका मुलाखतीत आपल्या तुरुंगवसाला क्रांतीशी जोडण्याचा प्रयत्न केला.

मद्य घोटाळ्यासंबंधी बोलतानाही केजरीवाल यांनी भूमिका मांडली. ‘पीएमएलए कायद्यामुळे बरेच काही बदलले आहे. आतापर्यंत एफआयआर नोंद केला जात होता. चौकशी होत होती, खटला सुरू व्हायचा, न्यायालय ठरवायचे कोण दोषी आहे आणि कोण नाही, मात्र आता सारे उलटे होऊ लागले आहे. आता गुन्हा दाखल होताच, ज्याच्यावर संशय आहे, त्याला अटक केली जाते. मग ती व्यक्ती जोपर्यंत निर्दोष ठरत नाही, तोपर्यंत ती तुरुंगात राहते. या पीएमएलएमुळे कोणालाही जामीन मिळत नाही. दोषसिद्धीचे प्रमाण येथे काहीच नाही. सर्व खोटी प्रकरणे आहेत,’ असेही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवृत्तीविषयी केजरीवाल यांना खूप उत्सुकता आहे. ‘अमित शहा आणि काही दुसरे नेते सांगत आहेत की, पंतप्रधान मोदी निवृत्त होऊ नयेत. मात्र स्वतः पंतप्रधान मोदी यांनी काहीही स्पष्ट केलेले नाही. जर त्यांनीच स्वतः बनवलेला नियम पाळला नाही तर, लोकांना वाटेल की केवळ अडवाणींचे करीअर संपवण्यासाठी त्यांनी सर्व काही केले होते. सध्या भाजपमध्ये उत्तराधिकाऱ्यावरून संघर्ष सुरू आहे. पंतप्रधान मोदींना वाटते की शहा यांनी पंतप्रधान व्हावे, परंतु यासाठी भाजपमधील लोकच तयार नाहीत,’ असे म्हणत त्यांनी मोदींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न केला.

हे ही वाचा:

आता व्हीआयपींनाही राम मंदिरात फोन नेण्यास बंदी

नुपूर शर्मांच्या हत्येचा कट: मौलवी सोहेलच्या अटकेनंतर आणखी दहशतवादी पकडले

हम तो डुबेंगे सनम…काँग्रेसने स्पष्ट केला इरादा

त्यांनी निभावला रोल बाकीच्यांचे फक्त झोल

मालीवाल प्रकरणीही सोडले मौन

स्वाती मालीवाल प्रकरणाचे खापरही त्यांनी मोदी यांच्यावर फोडले. ते म्हणाले, ‘या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचे दोन व्हर्जन सुरू आहेत. एक विभवकुमारचे आणि दुसरे स्वाती मालीवाल यांचे. मला मोदीजींना स्पष्ट सांगायचे आहे की, तुम्ही मला तोडण्यासाठी माझ्या अनेक नेत्यांना तुरुंगात टाकले. मात्र आता तर माझ्या आई-वडिलांना लक्ष्य केले जात आहे. त्यांनी सारी मर्यादा ओलांडली आहे,’ अशी टीका केजरीवाल यांनी केली.

Exit mobile version