माय होम इंडियाच्या माध्यमातून ११व्या वन इंडिया पुरस्काराचे वितरण २९ डिसेंबरला सायंकाळी होणार आहे. मेघालयातील सुप्रसिद्ध लेखक, गायक, कवी कोशंट सुमेर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अवर नॉर्थ इस्ट (O.N.E.) इंडिया म्हणजे वन इंडिया या नावाने हे पुरस्कार प्रतिवर्षी देण्यात येतात. यंदा या पुरस्काराचे हे ११वे वर्ष आहे.
दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात या पुरस्काराचे वितरण होणार आहे., स्वातंत्र्यसैनिक व प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक दत्तात्रय मायाळू (राजदत्त) यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. सारस्वत बँकेचे चेअरमन गौतम ठाकूर हे प्रमुख अतिथी असतील तर माय होम इंडियाचे संस्थापक व भाजपाचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर हे या कार्यक्रमातील प्रमुख वक्ते असतील. माय होम इंडियाचे व्यवस्थापकीय विश्वस्त श्रावण झा हेदेखील उपस्थित असतील.
कोशंट सुमेर हे सामाजिक कार्यकर्ते आहेत तसेच पत्रकारही आहेत. त्यांनी जैन्तिया, खासी, इंग्लिश अशा भाषांमध्ये लेखन केलेले आहे.
हे ही वाचा:
राजेश टोपेंना मिळणार ‘घोटाळेरत्न’ पुरस्कार
सुप्रिया सुळे कोरोनाच्या कचाट्यात! पती सदानंद सुळेंनाही झाली लागण
रणझुंजार नव्हे तर घरझुंजार! अतुल भातखळकर यांची टोलेबाजी
१९५९मध्ये ऑल इंडिया रेडिओ, शिलाँग येथे गायक म्हणून काम केलेले आहे. त्यांचे पहिले पुस्तक का पारोम पतेन सिएम का रि जैन्तिया हे १९६०मध्ये प्रकाशित झाले. त्यांना याआधीही विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. २००७मध्ये डॉ. आंबेडकर शिष्यवृत्ती देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
कोशंट सुमेर हे मेघालयातील काही प्रमुख संघटना व संस्थांचे सल्लागार आहेत. सुमेर यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी वाहिलेले आहे.