23.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषफडणवीसांच्या यॉर्करवर मविआ क्लीन बोल्ड

फडणवीसांच्या यॉर्करवर मविआ क्लीन बोल्ड

मालिकांच्या महायुतीमधील सहभागाबद्दल मांडली स्पष्ट भूमिका

Google News Follow

Related

ज्या बॉम्बस्फोटामुळ मुंबईत रक्ताचा सडा पडला. रक्तपात झाला त्या १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या लोकाशी व्यवहार केले त्यामुळ विद्यमान उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहासारखे गंभीर आरोप केले होते. नवाब मलिक यांचे अंडरवर्डशी संबंध असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी करून राज्यात खळबळ उडवून दिली होती. त्यांनतर नवाब मलिक यांची चौकशी सुरु झाली आणि २३ फेब्रुवारी २०२२ रोजी इडीने म्हणजेच अंमलबजावणी संचालनालायाने त्याना अटक केली. तब्बल दीड वर्षानंतर नवाब मलिक यांना तब्बेतीच्या कारणास्तव आता कुठ जामीन मिळाला आहे. ते नवाब मलिक जामीन मिळाल्यापासून कुठेही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये दिसले नाहीत पण गुरुवार पासून सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तान नागपूरमध्ये प्रकटले. मलिक हे आता राष्ट्रवादी मधील कुठल्या गटात सहभागी होतात याबद्दल अटकळ बांधली जात असतना आज ते सभागृहात सत्ताधारी लोकांच्या रांगेत बसून आपण कोणाच्या बाजूने हे त्यांनी स्पष्ट केल. मात्र मलिक यांच्या सत्ताधारी बाकावर बसण्याच्या कृतीन अनेकांच्या भुवया उंचावल्या कारण आज सत्तेत असलेल्यानीच त्यांच्यावर देशद्रोहाचे आरोप केले होते. आता तस बघायला गेल तर यामध्ये भारतीय जनता पक्षाचा कसलाही थेट सहभाग नाही. तरीही सायंकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र पाठवून मलिक यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नसल्याच फडणवीस यांनी सांगून विरोधी महाविकास आघाडीला क्लीन बोल्ड केल. ज्या मालिकांच्या येण्यान विरोधी पक्षान रान उठवण्याचा प्रयत्न केला आणि मलीकांवर देशद्रोहाचे आरोप केले ते आता त्या आरोपावर ठाम राहतात का ? ते पाहन महत्वाच असेल.

 

सत्ता का खेल चलेगा, सरकारे आयेगी जायेगी पार्तीया बनेगी बिघडेगी मगर ये देश रहना चाहिये इस देश का लोकतंत्र अमर रहना चाहिये अस भारतीय जनता पक्षाचे नेते आणि तत्कालीन पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी जी यांनी संसदेत विस्वास दर्शक ठरावावेळी सभागृहात सांगितल होत. आणि ज्या वाजपेयीजींच्या विचाराच्या आधारावर राजकारण समाजकारण करत असणार्या भारतीय जनता पक्षान असाच निर्णय घेण अभिप्रेत होत आणि भाजपचे राज्यातील नेते देवेंद्र फडणवीस यांनी तसा तो घेण्याच धाडस दाखवल आणि अजित पवार यांना पत्र पाठवून स्पष्टपणे नवाब मलिक यांच्याबद्दल आपली म्हणजे भारतीय जनता पक्षाची असलेली भूमिका विशद केली. सुरुवातीला आत्ता भाजपला किवा युतीला नवाब मलिक कसे चालतात अशी चर्चा माध्यमामध्ये करण्यात आली होती. त्यामुळ उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख श्री उद्धव ठाकरे यांची अवस्था हेची फळ काय मम तपाला अशी झाली होती. कारण नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतरसुद्धा त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा उद्धव ठाकरे यांनी घेतला न्हवता. त्यावेळी विरोधक आणि राज्यातील सामान्य जनतेचा तत्कालीन ठाकरे सरकारन रोष तर पत्करलाच पण फळ काय मिळाल तर आज नवाब मलिक जेव्हा जामिनावर बाहेर आले तर त्यांनी महाविकास आघाडीत न राहता अजित पवार यांच्या गटात जाण जास्त योग्य समजल. पण मलिक यांनी सत्ताधारी बाकांवर बसन म्हणजेच त्यांचा महायुतीमध्ये स्थान दिल्या सारखच किवा ते महायुतीमध्ये सामील आहेत असाच त्याचा अर्थ होतो हे लक्षात घेता फडणवीस यांनी अजित पवार यांना थेट पत्र पाठवून सत्ता येते जाते पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे अस सांगून नवाब मलिक यांना महायुतीमध्ये सामावून घेऊ नये अर्थात अजित पवार यांनी त्यांच्या पक्षात कोणाला घ्यायचे कोणाला घ्यायचे नाही हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न असला तरी महायुती म्हणून हा निर्णय योग्य नसल्याच त्यांनी कळवल आहे.

१९९३ च्या बॉम्ब स्फोटामधील आरोपी सरदार शावली खान आणि हसीना पारकर यांच्या जवळचा व्यक्ती सलीम पटेल याचे नवाब मलिक यांच्याशी व्यावसायिक संबध असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. कुख्यात गुंड दाउद नंतर हसीना पारकर मालमत्ता खरेदी करत होत्या. त्यात पोवेर ऑफ अतेर्णी सलीम पटेल याला लावत होत्या. तीच मालमत्ता नवाब मलिक यांच्या नातेवाईकांनी खरेदी केली असाही गंभीर आरोप आहे. मुंबईमधील कुर्ला इथली एलबीएस रस्त्यावरील कोट्यावधी किमतीची जागा केवळ ३० एक लाखात खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. राज्यात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे असताना महाविकास आघाडीच्या काळात नवाब मलिक यांना अटक झाली आणि तब्बल दीड वर्षानंतर त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला. याच वेळी राष्ट्रवाडी कॉंग्रेसमध्ये फुट पडली आणि अजित पवार हे समर्थक आमदार घेऊन बाहेर पडले. त्यानंतर नवाब मलिक कोणाबरोबर जाणार अशा चर्चा रंगू लागल्या होत्या मात्र मलिक आणि तशी कोणतीच भूमिका जाहीर केली नव्हती. ते आज थेट नागपूरमध्ये अवतरले आणि साभागृहात सत्ताधारी बाकड्यावर जाऊन बसले. विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबद्दल जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी आपली भूमिका जाहीर केली आम्ही कोणाच्याही मांडीला मांडी लावून बसलेलो नाही जेव्हा नवाब मलिक यांचावर आरोप झाले आणि त्याना अटक झाली तेव्हा ते जेल मध्ये असतानासुद्धा मंत्री होते तेव्हा महाविकास आघाडी सरकारने त्यांचा राजीनामा का घेतला नाही याचे आधी उत्तर विरोधी पक्षांनी देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. भारतीय जनता पक्षान नवाब मलिक यांना कुठे भाजपमध्ये घेतलेले नाही किवा त्यांना काही मंत्री वगैरे पण बनवलेले नाही. मलिक हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आहेत आणि त्यांनी कोणाबरोबर जायचे हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. त्यांना अजित पवार यांच्याबरोबर जाणे योग्य वाटले ते शरद पवार यांच्याबरोबर गेले नाहीत. जर ते अजित पवार यांच्या बरोबर गेले तर ते अजित पवार यांच्या गटाला ठरवून दिलेल्या बाकांवरच बसणार ते इतर कुठेहि बसू शकत नाहीत त्यामुळे आज ते सत्ताधारी पक्षाच्या बाकांवर बसले.

 

देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर जे आरोप यापूर्वी केले होते त्यातून ते कुठेही मागे फिरले असा प्रकार त्यांनी केलेला नाही. ती बाब आता न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे त्यावर न्यायालय योग्य तो निर्णय घेईल. केवळ आणि केवळ मलिक यांनी सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार गटाला पाठींबा दिला असल्यामूळ ते आज सत्ताधारी गटाच्या बाकावर बसले. जर त्यांच्यावरील आरोप मागे घेतले असते, न्यायालयात सुरु असणारी केस मागे घेतली असती तर गोष्ट वेगळी असा कुठलाच प्रकार झालेला नाही. राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृवात सरकार कार्यरत असताना अजित पवार हे सत्तेत सहभागी झाले. आणि नवाब मलिक हे त्यांच्या गटाचे आमदार असल्यामूळ त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला विधानभवन मध्ये देण्यात आलेल्या पक्षाच्या कार्यालात जाणे किवा सभागृहात सत्ताधारी गटाच्या बाकावर बसण हे ओघान आलच. हे अस जरी असल म्हणजे नवाब मलिक याचं अजित पवार गटात जाण आणि त्यामुळ त्यांनी सत्ताधारी बाकावर बसण अस वेगळ करता येणार नाही कारण आज सत्तेत केवळ भारतीय जनता पक्ष आहे अशातला भाग नाही तर सत्तेत तीन पक्ष आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट अशी मिळून महायुती तयार झाली आहे, हे विसरून चालणार नाही.

 

ज्या नवाब मलिक यांच्यावर इतक्या गंभीर स्वारूपाचे आरोप होतात त्यांना अटक होते केवळ जामिनावर ते बाहेर आहेत त्यांना काही पुराव्याअभावी न्यायालयान त्यांची निर्दोष मुक्तता वगैरे केली आहे अशातला भाग नाही. केवळ जमीन तो हि तात्पुरत्या स्वरूपाचा इतकाच तो काही भाग आहे. राजकारणात काही अपरिहार्यता असली तरी लोकांना गृहीत धरण सुद्धा योग्य नसत. लोकांना गृहीत धरण्याचे परिणाम काय होतात ते राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आणि प्रदीर्घ अनुभव असणार्या सर्वांना माहिती आहे. त्यामुळ नवाब मलिक यांचा महायुतीमधील सहभाग हा महायुतीसाठी घातक ठरणारच होता. याचा अचूक अंदाज घेत आणि राष्ट्र प्रथम मानणाऱ्या भारतीय जनता पक्षान तशी भूमिका घेतली त्याच स्वागतच करायला पाहिजे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा