नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर महाविकास आघाडीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली बेळगावमध्ये आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलकांना कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली मविआ कार्यकर्ते बेळगावच्या सीमेवर दाखल झाले होते. यावेळी घोषणा,आंदोलन सुरु होते. मात्र काही वेळातचं कर्नाटक पोलिसांनी हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन बेळगावात सोमवारी सुरु होणार आहे. त्याला उत्तर म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीकडून व्हॅक्सीन मैदानावर आयोजित केलेल्या मेळाव्याला अचानक कर्नाटक पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.
मेळावा घेण्यासाठी एक महिन्यापूर्वी रितसर अर्ज करून देखील पोलिसांनी सोमवारी सकाळी मेळावा होणाऱ्या व्हॅक्सीन डेपो मैदान परिसरात १४४ कलम लागू केला. तसेच या ठिकाणी येणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक करण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या कार्यकर्त्यांना कोणत्या ठिकाणी नेण्यात आले आहे याबाबतची माहिती देखील पोलिसांकडून दिली जातं नसल्याचे दिसून येत आहे.
हे ही वाचा:
‘मोदी यांच्या भूमिकेमुळे जागतिक संकट टळले’
चुकीच्या विधानामुळे किरण रिजिजूनी राहुल गांधींना फटकारले
६० दिवस २२ पोलिस घेत आहेत मुलीचा शोध
महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आयोजित मेळाव्यासाठी उभारण्यात येत असलेल्या स्टेजच्या उभारणीचे काम थांबवण्यात आले. तसेच स्टेज हटवण्यात आला आहे. रविवारी मेळाव्यास कर्नाटक पोलिसांकडून परवानगी देण्यात आली होती. मात्र, आता अचानक काम थांबवण्यात आले आहे.