काही दिवसांपूर्वी स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेलेल्या मुस्तफिजुरचा आयपीएलमध्ये दमदार कमबॅक

मुस्तफिजुरने कोहलीलाही बाद केले

काही दिवसांपूर्वी स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेलेल्या मुस्तफिजुरचा आयपीएलमध्ये दमदार कमबॅक

आयपीएल २०२४ च्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने ६ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात मुस्तफिजुरने ४ विकेट्स घेतल्या. आरसीबीचे ओपनिंग फलंदाज धावांचा वर्षाव करत असताना सीएसकेने मुस्तफिजुरला गोलंदाजीसाठी बोलावले. मुस्तफिजुरने येताच विकेट घेतली. आयपीएलपूर्वी त्याला दुखापत झाली होती. स्ट्रेचरच्या साहाय्याने त्याला मैदानाबाहेर नेण्यात आले होते.

आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याच्यासाठी फाफ डु प्लेसिस आणि विराट कोहली सलामीला आले. यावेळी डु प्लेसिसने सीएसकेच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करायला सुरुवात केली. यानंतर सीएसकेने पाचवे षटक मुस्तफिजुरकडे सोपवले. त्याने षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर डु प्लेसिसची विकेट घेऊन त्याला तंबूत धाजले. डु प्लेसिसने २३ चेंडूत ३५ धावा केल्या. त्यानंतर मुस्तफिजुरने रजत पाटीदारलास पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याला खातेही उघडता आले नाही. या सामन्यात मुस्तफिजुरला सामनावीरही घोषित करण्यात आले.

मुस्तफिजुरने कोहलीलाही बाद केले

सीएसकेने पुन्हा डावाचे १२ वे षटक मुस्तफिजुरला दिले. त्याने षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर विराट कोहलीची विकेट घेतली. त्याने २० चेंडूत २१ धावा केल्या. यानंतर षटकाच्या चौथ्या चेंडूवर मुस्तफिजुरने कॅमेरून ग्रीनची विकेट घेतली. ग्रीनने २२ चेंडूत १८ धावा केल्या.

हेही वाचा :

टीएमसीच्या नेत्या महुआ मोईत्रा यांच्या संबंधित ठिकाणांवर सीबीआयकडून धाडसत्र

दिवाळे गावातील मच्छिमार बांधवांना नुकसान भरपाई द्या

मुइज्जूनी गुडघे टेकले; आर्थिक चणचणीमुळे मालदीवने भारतासमोर पसरले हात

‘गरज पडल्यास तुरुंगातून सरकार चालवेन’

मुस्तफिजुर स्ट्रेचरच्या साहाय्याने मैदानाबाहेर

काही दिवसांपूर्वी मुस्तफिदुर जखमी झाले होते. मुस्तफिजुर १८ मार्च रोजी श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या एकदिवसीय सामन्यात खेळला होता. या सामन्यादरम्यान तो पहिल्या डावातील ४८ वे षटक करत होता. यावेळी त्रास जाणवून तो जमिनीवर पडला होता. यानंतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी फिल्ड गाठून स्ट्रेचरच्या साहाय्याने त्याला मैदानाबाहेर नेले. त्यामुळे तो आयपीएलमधून बाहेर पडेल, असे मानले जात होते. पण मुस्तफिजुरने शानदार पुनरागमन केले.

Exit mobile version