उत्तराखंडमधील मसुरीत चहामध्ये थुंकल्याचा प्रकार नुकताच समोर आला होता. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांकडून संताप करत आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली गेली. याबाबत तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आणि दोघांना ताब्यात घेतले. मोहम्मद नौशाद आणि मोहम्मद हसन अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डेहराडूनच्या नेहरू व्हिलेजमध्ये राहणारे हिमांशू बिश्नोई २९ सप्टेंबर २०२४ रोजी मसुरीला भेट देण्यासाठी आले होते. हिमांशूने दिलेल्या तक्रारीनुसार, मसुरीतील लायब्ररी चौकात उभा असताना दोन तरुण चहा, मॅगी, बन बटर विकताना दिसले. त्याच्याकडून चहा घेतला आणि परिसरात दाट धुके पसरले असल्याने मोबाईल काढून शूट करण्याचे ठरवले. यावेळी त्याच चहाच्या स्टॉलवरील एक तरुण चहाच्या भांड्यात थुंकत असताना दिसला आणि ते मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाले.
हे ही वाचा :
महादेव बेटिंग ऍप प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ चंद्राकरला दुबईतून अटक
बलुचिस्तानमध्ये कोळसा खाणकाम मजुरांवर गोळीबार; २० जण ठार
पंतप्रधान मोदींनी भेट दिलेला देवी कालीचा मुकुट बांगलादेशातील मंदिरातून गेला चोरीला
इस्रायलकडून मध्य बेरूतमध्ये हवाई हल्ला; २२ ठार
हिमांशूने यांनी या प्रकरणी विचारले असता मोहम्मद नौशाद आणि मोहम्मद हसनने शिवीगाळ करत त्यांना मारण्याची धमकी दिली, हे दोघेही भाऊ आहेत. यानंतर त्यांनी पोलीस ठाणे गाठत पुरावा सादर केला. त्यानंतर मसुरी कोतवाली पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करत शोध सुरु केला. पोलिसांनी चौकशी करत मुजफ्फरनगरमध्ये रहिवासी असणाऱ्या मोहम्मद नौशाद आणि मोहम्मद हसनला बेड्या ठोकल्या.