रविवार एक ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे मुस्लिम महिला हक्क दिन साजरा करण्यात आला. देशभरातील विविध संघटनांनी एकत्र येत हा दिवस साजरा केला. त्याचे महत्त्व इतके जास्त होते की एक नाही, दोन नाही तर तब्बल तीन तीन केंद्रीय मंत्र्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. हा दिवस साजरा करण्यालाही एक ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भारत सरकारने आजपासून तब्बल दोन वर्षांपूर्वी म्हणजेच १ ऑगस्ट २०१९ रोजी मुस्लीम महिलांच्या न्याय्य हक्कांसाठी महत्त्वपूर्ण असा कायदा पारित केला. या कायद्यानुसार अमानवीय असा तिहेरी तलाक रद्द करण्यात आला आणि केवळ तेवढ्यावरच न थांबता तिहेरी तलाकला सामाजिक गैरकृत्य मानून त्याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्याची ही तरतूद सरकारने केली.
हे ही वाचा:
पूर, दरडींनंतर महाडवासियांसमोर आता नवे संकट!
दगडफेक करणाऱ्या दहशतवाद्यांना दणका
बीडीडीच्या पुनर्विकासाचा पुन्हा शुभारंभ
मोदी सरकारच्या या निर्णयासाठी देशभरातील मुस्लिम महिला कायमच त्यांचे कौतुक करताना दिसतात. तर त्यामुळेच हा दिवस मुस्लिम महिला हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. आज दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात महिला आणि बालविकास मंत्री श्रीमती स्मृती इराणी, अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी आणि पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी उपस्थिती लावली. या वेळी त्यांनी तिहेरी तलाक पिडीत महिलांशीही संवाद साधला.
यावेळी उपस्थित मुस्लिम महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तिहेरी तलाक विरोधी कायदा केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. सरकारने देशातील मुस्लिम महिलांचे “स्वावलंबन, स्वाभिमान आणि आत्मविश्वास” बळकट केला आहे आणि तिहेरी तलाकविरोधात कायदा आणून त्यांच्या घटनात्मक, मूलभूत आणि लोकशाही अधिकारांचे संरक्षण केले आहे असे मत या महिलांनी व्यक्त केले.