‘गैर मुसलमान महिलांनी हिजाब वापरावा, त्यात काही गैर नाही’ असे सांगत मुलींना हिजाबच्या जाळ्यात ओढण्याचा गंभीर प्रकार सध्या महाराष्ट्रात घडताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या साऱ्या कुरापती थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर सुरु आहेत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर ‘हिजाब डे’ साजरा करण्यासाठी पत्रके वाटण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. जमात-ए-इस्लामी हिंदी या संस्थेच्या महिला शाखेतर्फे ही पत्रके वाटली जात होती. यात प्रामुख्याने १५ ते २५ वयोगटातील गैर मुसलमान मुलींना लक्ष्य केले जात होते. हिजाबच्या जाळ्यात अडकवून या तरूणींचे धर्मांत करण्याचा हा घाट घातला होता का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. नागपूर येथे ही घटना घडली आहे. नागपूर येथील मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर ही पत्रके वाटताना काही मुसलमान महिला आढळून आल्या.
शनिवार, ४ सप्टेंबर रोजी हा प्रकार घडला. नागपूर येथील मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर असलेल्या वॉकर स्ट्रीट या परिसरात काही महिला हिजाब संदर्भातील ही पत्रके वाटताना दिसल्या. त्यांनी विशेष करून गैर मुसलमान मुली आणि महिलांना लक्ष्य केले होते. या पत्रकारमध्ये १५ ते २५ वयोगटातील मुलींनी कुराण आणि सुन्नाहचे ज्ञान पसरवण्या विषयी भाष्य केले होते.
हे ही वाचा:
अनिल देशमुख फरार; ईडीने बजावली लूकआऊट नोटीस
केरळमध्ये अशी झाली ‘दृश्यम’ स्टाईल हत्या
कृष्णा नागरची ‘शटल’ एक्स्प्रेस; जिंकले सुवर्ण
हा प्रकार जेव्हा स्थानिक नागरिकांच्या लक्षात आला तेव्हा त्यांनी यावर आक्षेप घेतला. तेव्हा या महिला त्या नागरिकांची हुज्जत घालू लागल्या. आवाज चढवून त्यांच्याशी बोलू लागल्या. आरेरावी करू लागल्या. धक्कादायक बाब म्हणजे त्या महिलांसोबत तीन गैर मुस्लिम मुली देखील होत्या. ज्यातील एक मुलगी अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. या मुलींनीही हिजाब घातला होता. ‘आम्ही स्वेच्छेने हा परिधान केला आहे’ असे त्या सांगत होत्या.
Same incident captured.same kind of incident I shared on my TL.
This kind of incidents happened in 20 different places at Nagpur.ह्या हिन्दु मुलींचे विचर ऐका 😡😡😡👇 pic.twitter.com/WJiwv8gYPM
— ηιℓιмα (@Nilima_W) September 4, 2021
याविषयी स्थानिक नागरिकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. प्रत्यक्षदर्शी नागरिकांचे असे म्हणणे आहे की या पंधरा-वीस महिला गैर मुसलमान मुलींना थांबवून त्यांना हिजाब घालण्यासाठी प्रवृत्त करत होत्या. ४ सप्टेंबर हा जागतिक हिजाब दिवस आहे असे खोटे त्या सांगत होत्या. तर हिजाब बांधणे काहीच गैर नाही, जगात कोणतीही व्यक्ती हिजाब घालू शकते असे त्या सांगत फिरत होत्या. वास्तविक हिजाब डे हा दर वर्षी १ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.
या महिलांसोबत काही पुरुषही होते. ते घटनास्थळापासून थोडे दूर त्यांच्या गाड्यांवर उभे होते. या महिलांना स्थानिकांनी पिटाळून लावल्यावर त्या महिला त्यांच्या साथीदारांपाशी गेल्या आणि त्या सर्वांनी तिथून काढता पाय घेतला.
या टोळक्याच्या गाड्यांचे नंबर स्थनिकांनी नोंदवले आहेत. तर त्या महिला वाटप करत असलेली पत्रकेही स्थानिकांनी ताब्यात घेतली आहेत. या सर्व गोष्टी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी कठोर कारवाई करावी आणि या सर्व प्रकारांना त्वरित आळा घालावा अशी स्थानिक नागरिकांची अपेक्षा आहे.
Taliban at #Nagpur?@TOI_Nagpur
@SunilWarrier1
@vijaypTOI@BJP4Nagpur
@vaibhavgTOI
@green_vigil
@vrNagpur@SandipJoshiNGP@nagpurcp@soumitraboseTOI@thakkar_sameet@dheeraj_fartode@TheHitavada1911@OpIndia_com pic.twitter.com/KFWwSp6Hyz— ηιℓιмα (@Nilima_W) September 4, 2021