जम्मू-काश्मीरमध्ये देशविरोधी आणि फुटीरतावादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या आणि दहशतवादी कारवायांचे समर्थन करणाऱ्या मुस्लिम लीग जम्मू काश्मीरवर बंदी घालण्याचा निर्णय बुधवारी जाहीर करण्यात आला. तशी अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मसरत आलम भट यांच्या अध्यक्षतेखाली हि संघटना कार्यरत होती आणि खास करून भारतविरोधी आणि पाकिस्तान समर्थन प्रचारासाठी तिची ओळख आहे. जम्मू आणि काश्मीरचे भारतापासून स्वातंत्र्य मिळवणे, पाकिस्तानमध्ये विलीन होणे आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये इस्लामिक राज्य स्थापन करणे हे या गटाचे उद्दिष्ट असल्याचे देखील त्यात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा..
फ्रॉड लोन ऍपच्या जाहिराती दाखवाल तर खबरदार!
राम मंदिर उद्घाटनाचे आमंत्रण नाकारणाऱ्या येचुरींना विहिंपचा सल्ला
भारत जोडून झाल्यावर राहुल गांधींची आता न्याय यात्रा
सीएएची अंमलबजावणी करण्यापासून कोणी रोखू शकत नाही!
अधिसूचनेत असेही म्हटले आहे की, या गटाचे सदस्य जम्मू आणि काश्मीरमधील फुटीरतावादी कारवायांमध्ये गुंतले आहेत. याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक्सवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मुस्लिम लीग जम्मू काश्मीर (मसरत आलम गट) ही युएपीए अंतर्गत ‘बेकायदेशीर संघटना’ म्हणून घोषित करण्यात आली आहे. ही संघटना आणि तिचे सदस्य देशविरोधी गुंतलेले आहेत. आणि जम्मू-कश्मीरमधील फुटीरतावादी कारवाया दहशतवादी कारवायांचे समर्थन करत आहेत आणि लोकांना जम्मू-काश्मीरमध्ये इस्लामिक शासन स्थापन करण्यास प्रवृत्त करतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा संदेश स्पष्ट आहे की, आपल्या देशाची एकता, सार्वभौमत्व आणि अखंडतेच्या विरोधात कृती करणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही आणि असे कृत्य करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई होणारच आहे. याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सैन्याच्या शौर्याबद्दल कौतुक करत लष्कर जम्मू-काश्मीरच्या मातीतून दहशतवादाचा नायनाट करेल, असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, मला लष्कराच्या शौर्यावर आणि चिकाटीवर विश्वास आहे. जम्मू-काश्मीरमधून दहशतवाद संपवला गेला पाहिजे, असेही ते म्हणाले.