‘इस्रायल-हमासचे युद्ध पंतप्रधान मोदीच थांबवू शकतात’

युद्ध रोखण्यात मुस्लिम राष्ट्रे अपयशी ठरल्याची इमाम बुखारींची टीका

‘इस्रायल-हमासचे युद्ध पंतप्रधान मोदीच थांबवू शकतात’

इस्रायल-हमास यांच्या दरम्यान सुरू असलेल्या युद्धाला तीन महिने पूर्ण होत आले तरी हे युद्ध संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. या दरम्यान दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम सैयद अहमद बुखारी यांनी ‘मुस्लिम राष्ट्रे हे युद्ध थांबवण्यात अपयशी ठरले असून पंतप्रधान मोदीच हे युद्ध थांबवू शकतात,’ असे म्हटले आहे.

‘मुस्लिम राष्ट्रे इस्रायल-पॅलिस्टिनी संघर्षात स्वतःची जबाबदारी पूर्ण करण्यात अपयशी ठरली आहेत,’ असे सांगून अहमद बुखारी यांनी इस्रायलवर राजकीय दबाव आणून आणि युद्धाला संपवण्याची विनंती पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे. ‘पॅलिस्टिनींचा मुद्दा आता अशा स्थानी पोहोचला आहे, जिथे दोन राज्ये सिद्धांताच्या आधारावर संयुक्त राष्ट्रे, अरब लीग आणि आखाती सहयोग परिषदेच्या प्रासंगिक प्रस्तावांसह या समस्येचे तातडीने आणि कायमस्वरूपी निराकरण गरजेचे आहे,’ असे त्यांनी नमूद केले आहे.

हे ही वाचा:

मोदींनी मीरा मांझींच्या हातचा चहा प्यायल्यावर त्या म्हणाल्या, माझा देव घरी आला!

बाळासाहेबांच्या वक्तव्याचा आधार घेऊन बाबरी पतनाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न

जय श्री राम: पंतप्रधान मोदींनी १९९२ मध्ये हाती घेतलेला संकल्प अखेर पूर्ण!

मराठवाड्याची लेक करणार नव्या जालना- मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे सारथ्य

‘मुस्लिम राष्ट्रे या प्रकरणी आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडू शकली नाहीत. त्यांनी जी पावले उचलणे गरजेचे आहे, ते ती उचलत नसून हे अतिशय दुर्दैवी आहे. त्यामुळे अखेरीस मला अशी आशा आहे की, माझे पंतप्रधान इस्रायलच्या पंतप्रधानांसह स्वतःच्या व्यक्तिगत संबंधांच्या आधारे या युद्धाला थांबवण्यासाठी आणि समस्यांवर उपाय करण्यासाठी राजकीय दबाव आणतील,’ असे इमाम बुखारी यांनी म्हटले आहे.

Exit mobile version