‘मोदींना विरोध करून मुस्लिमांना कोणताही फायदा झालेला नाही!’

ऑल इंडिया मुस्लीम समाजचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्धीन रजवी यांचे आवाहन

‘मोदींना विरोध करून मुस्लिमांना कोणताही फायदा झालेला नाही!’

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुस्लीम समाजाने विरोध करू नये. सकारात्मक विचार करून पुढे जावे, असे आवाहन ऑल इंडिया मुस्लीम समाजचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्धीन रजवी यांनी केले आहे. बरेली येथे मौलाना रजवी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या समर्थनार्थ आज मुस्लीम समाजाला अपील केले आहे.

हे ही वाचा:

भारताचा इंग्लंडवर पाच विकेट्स राखून विजय; सामन्यासह मालिका खिशात

‘सुशांतसारखे टोकाचे पाऊल उचलण्याच्या विचारात होतो’

गुजरात मानवी तस्करी प्रकरणातील ‘डर्टी हॅरी’ला अमेरिकेत अटक

‘सीता’ आणि ‘अकबर’ सिहांच्या जोडीचा वाद, वन अधिकारी निलंबित!

यावेळी बोलताना रजवी म्हणाले, सध्याचा काळ हा जलद बदलत आहे. येणाऱ्या काळात आणखी बदल होणार आहे. त्यामुळे मुस्लीम समाजाने आपल्या भविष्याचा विचार करण्याची गरज आहे. काही वर्षांपसून आपण बघत आहोत कि राजकीय पक्ष हे धर्मनिरपेक्षतेच्या नावावर मुस्लीम समाजाचा केवळ राजकारणासाठी वापर करत आहेत. मुस्लीम समाजाला राजकीय पक्षाचा मोहरा बनवला जात आहे. त्यामुळे केवळ मुसलमान हा मोदींचा विरोधक आहे आणि बाकी सगळे त्यांचे समर्थक आहेत असे वातावरण तयार होते. विरोध करून मुसलमान समाजाला काही आतापर्यंत फायदा झालेला नाही आणि भविष्यात काही फायदा होईल याची शक्यता नाही. हिंदू आणि मुसलमान यांच्यात तणाव निर्माण होत असल्याने भारतीय समाजाचे नुकसान होत आहे.

Exit mobile version