एलॉन मस्क यांचे ट्विटर पुन्हा एका बदलत्या टप्प्यातून जाणार आहे. एलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर, ते ट्विटरच्या नियमांमध्ये सातत्याने बदल करत आहेत. आता एलॉन मस्क यांनी जी ट्विटर खाती वापरकर्ते वापरात नाहीत त्यासंदर्भात निर्णय घेतला आहे.
एलॉन मस्क यांनी ट्विटर घेतल्यानंतर अनेक बदल केले आहेत. जे बदल काही लोकांना पटले तर काहींना नाही. ट्विटरवर अनेक अशी खाती आहेत जी वापरली जातं नाहीत. वापरकर्त्यांनी ट्विटर फक्त खाते बनवून ठेवले आहे, मात्र ते वापरत नाहीत. अशा खात्यांचा आकडा किमान १५० कोटी आहे. आता ती सर्व खाती ट्विटरवरून हटवली जाणार आहेत.
आताच्या नव्या नियमानुसार, जे वापरकर्ते ट्विटरची खाती वापरत नाहीत, अशा वापरकर्त्यांची खाती ट्विटरवरून हटवली जाणार आहेत. मस्क यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. जी खाती नावापुरती आहेत. म्हणजे खूप वर्षात त्यावरून काही ट्विट केले नाही आहे, अशा वापरकर्त्यांची खाती हटवली जाणार आहेत.
Twitter will soon start freeing the name space of 1.5 billion accounts
— Elon Musk (@elonmusk) December 9, 2022
हे ही वाचा :
बुलेट ट्रेनसाठी खारफुटीची झाडे तोडण्यास न्यायालयाचा हिरवा कंदिल
रेल्वेचा कुली; पण गरिबांचा शिक्षक
इशान किशनने पाडला बांगलादेशमध्ये पाऊस, १२६ चेंडूंत २०० धावांचा विश्वविक्रम
मस्क यांच्या या निर्णयाचा अशा वापरकर्त्यांना फायदा होईल ज्यांना विशिष्ट युजरनेम हवे आहे. परंतु, ते कोणीतरी आधीच घेतलेले आहे. तो व्यक्ती ते खातं वापरत नसल्याने नवीन वापरकर्त्याला ते मिळवू शकत नाही. मस्क यांच्या या हालचालीमुळे ट्विटर मध्ये बऱ्याच नावांसाठी जागा मोकळी होईल. पण त्यासोबतचं या निर्णयामुळे ट्विटरचा वापरकर्ते आणखी कमी होतील. मात्र, हा निर्णय कधी लागू होणार हे मस्क यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही.