एलॉन मस्क यांचा हमासवर ‘हल्ला’

मस्क यांनी हमास दहशतवादी संघटनेसंबंधी शेकडो अकाऊंट्स हटवली

एलॉन मस्क यांचा हमासवर ‘हल्ला’

इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षाने युद्धाचे रूप धारण केले असून त्यांच्यात सुरु असलेल्या युद्धाचा आठवा दिवस आहे. आतापर्यंत दोन्ही बाजूने मोठी जीवितहानी आणि वित्तहानी झालेली आहे. अशातच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर) चे संस्थापक एलॉन मस्क यांनी मोठे पाऊल उचलले आहे.

एलॉन मस्क यांनी हमासशी संबंधित शेकडो खाती एक्सवरून हटवली आहेत. दहशतवादी संघटनांसाठी ‘एक्स’वर अजिबात स्थान नाही, असं म्हणत त्यांनी हा निर्णय घेत सर्व अकाऊंट्स हटविली आहेत.

एक्सच्या सीईओ लिंडा याकारिनो यांनी म्हटलं आहे की, “एक्स लोकांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे, सध्याचा काळ महत्वाचा आहे. आमच्या माध्यमावर पोस्ट केल्या जाणाऱ्या बेकायदा आणि चुकीच्या पोस्टने काय होऊ शकतं हे आम्हाला माहित आहे. दहशतवादी संघटना, फुटिरतावादी यांना एक्स वर स्थान नाही. आत्तापर्यंत अशी शेकडो खाती हटवण्यात आली आहेत आणि ही प्रक्रिया यापुढेही सुरु राहणार आहे.”

सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करण्यात येतो त्याबाबत युरोपियन युनियनने चिंता व्यक्त केली होती. एक्स आणि फेसबुक अशा दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन आक्षेपार्ह किंवा भावना भडकवणारा, चिथावणी देणारा मजकूर हटवण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीला एलॉन मस्क यांनी २४ तासाच्या आत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

हे ही वाचा:

कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी माजी आमदार विवेक पाटील यांची दीडशे कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

इस्रायलच्या लष्कराने हमासच्या ताब्यातून केली २५० ओलिसांची सुटका

मद्यधुंद निवृत्त जवानाने राजधानी एक्स्प्रेसमध्ये झाडली गोळी

हमास दहशतवाद्यांचे नृशंस कृत्य; तान्ह्या मुलांची केली कत्तल

मस्क यांनी मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेत हमास या दहशतवादी संघटनेला आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या सर्व अकाऊंट्सवर बंदी आणली आहे. त्यांना एक्सवर अजिबात स्थान नाही म्हणत शेकडो अकाऊंट्स हटवली आहेत आणि ही प्रक्रिया यापुढेही चालणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

Exit mobile version