नाटू नाटू गाण्याचे प्रसिद्ध संगीतकार एम. एम. किरवाणींना झाला कोरोना

डॉक्टरांनी दिला आराम करण्याचा सल्ला

नाटू नाटू गाण्याचे प्रसिद्ध संगीतकार एम. एम. किरवाणींना झाला कोरोना

कोरोनाचा विळखा आता पुन्हा एकदा वाढत आहे. भारतात आतापर्यंत अनेक लोक या संसर्गाच्या विळख्यात आले आहेत. आता सेलिब्रेटीही या संसर्गाला बाली ठरत आहेत. नाटू नाटू गाण्याचे प्रसिद्ध संगीतकार एम. एम. किरवाणी यांना कोरोनाची लागण झाली आहे. एमएम किरवाणी यांनी काही दिवसांपूर्वी ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. नाटू नाटू या गाण्याला बेस्ट ऑरिजनल साँग या कॅटेगिरीमधील पुरस्कार मिळाला. सध्या ते औषधोपचारावर असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. स्वतः किरवाणी यांनी कोविडची लागण झाली असण्याला दुजोरा दिला आहे.

संगीतकार किरवाणी यांनी एका वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये एमएम किरवाणी म्हणाले, ‘प्रवास आणि उत्साहाचा परिणाम म्हणून मला आता कोविडचा त्रास होत आहे. मला कोविडची लागण झाली आहे. सध्या मी औषधोपचार घेत आहे. मला डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

संगीत दिग्दर्शक एम. एम किरवाणी यांनी संगीतबद्ध केलेले नाटु नाटु हे गाणे मागील वर्षातील हिट ट्रॅकपैकी एक आहे. ऑस्करपूर्वी ८० व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार २०२३ मध्ये सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचे शीर्षक जिंकले होते ऑस्कर पुरस्काराच्या आठवी जागवताना देताना एमएम कीरावानी म्हणाले की ‘हे सर्व विश्वासाच्या पलीकडे आहे’. भविष्यातही आम्ही अमेरिकेतील सर्व पुरस्कार सोहळ्यांमध्ये जिंकत राहू. ‘नाटु नाटु’ ही आता जागतिक घटना बनली आहे. या सोबतच किरवाणी यांनी आपला आनंद पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांसोबत शेअर केला.

हे ही वाचा:

तीन-चार वर्षात देशात उभारली जातायेत ‘इतकी’ विमानतळे

आगीत साकीनाकाजवळील दुकान भस्मसात, एकाचा मृत्यू

विश्वविजेती निखत झरीन गोपीचंदच्या पावलावर पाऊल टाकणार, उघडणार बॉक्सिंग अकादमी

कॅलिफोर्नियाच्या गुरुद्वारात झाडल्या गोळ्या, २ जण जखमी

पूजा भटला देखील संसर्ग

अभिनेत्री आणि खासदार किरण खेर यांना कोविड पॉझिटिव्ह असल्याची बातमी अलीकडेच आली होती. त्याचवेळी, आता अभिनेत्री पूजा भट्टने देखील चाहत्यांना कोविड संसर्ग झाला असल्याचे दोन दिवसांपूर्वीच सांगितले होते. बरोबर तीन वर्षांनंतर मला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे. कोविड अजूनही आसपास आणि लसीकरणानंतरही तो तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. आशा आहे की मी लवकरच परत येईन, असे पूजा भटने म्हटले होते.

Exit mobile version