या राज्यात उभारणार लता दीदींच्या नावे संगीत अकादमी आणि संग्रहालय

या राज्यात उभारणार लता दीदींच्या नावे संगीत अकादमी आणि संग्रहालय

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण भारतात शोककळा पसरली आहे. सर्वच स्तरांवरून लता दीदींना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या निधनानंतर दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्येही सोमवारी अर्धा दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली तर सार्वजनिक ठिकाणी १५ दिवस लता दीदींची गाणी वाजवली जाणार आहेत. असाच एक महत्त्वाचा निर्णय मध्य प्रदेशमधील सरकारने घेतला आहे.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी महत्वाची घोषणा केली आहे. इंदूरमध्ये लता मंगेशकर यांचा पुतळा बसविण्यात येणार असून दरवर्षी त्यांच्या वाढदिवशी ‘स्व. लता मंगेशकर पुरस्कार’ दिला जाणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली आहे. स्व. लता मंगेशकर यांच्या नावाने संगीत अकादमी स्थापन केली जाईल. लताजींनी जी काही गाणी गायली ती सर्व गाणी उपलब्ध असणारे एक संग्रहालय बांधण्यात येणार आहे.

लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी रविवारी “स्वर कोकिळा लता मंगेशकरजी आता नाहीत. दीदी तुमच्याशिवाय हा देश उजाड आहे, गाणी आणि संगीत शांत झालंय. तुम्हाला संगीत आणि संगीताची देवी मानून तुमची उपासना करत राहीन” अशा शब्दात भावना व्यक्त केल्या होत्या.

हे ही वाचा:

…आणि चीनने पाकिस्तानला एक दमडीही दिली नाही

कर्नाटकातील शाळांमध्ये हिजाब विरुद्ध भगवा वाद

राज्यसभेत लता दीदींना वाहिली श्रद्धांजली

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला मिळाल्या पहिल्या महिला कुलगुरू

काल ६ फेब्रुवारी रोजी सकाळी मुंबईतील रुग्णालयात लता मंगेशकर यांची प्राणज्योत मालवली. सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी लता दीदींना आदरांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लता दीदींना आदरांजली वाहण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते.

Exit mobile version