पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात वक्फ कायद्यावरून झालेल्या हिंसक निदर्शनांनंतर आता या भागातील जीवन सामान्य होताना दिसत आहे. हिंसाचारानंतर बंद असलेल्या मुर्शिदाबादमधील शाळा तब्बल १० दिवसांनंतर पुन्हा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, परिसरात सुरक्षा दल तैनात असून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
एएनआय वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, याबाबत मुर्शिदाबादमधील एका स्थानिक रहिवाशाने सांगितले की, “१० दिवसांनी येथे शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. ११ एप्रिल रोजी झालेल्या हिंसाचारामुळे शाळा बंद होत्या. धुलियानमधील परिस्थिती आता चांगली आहे. आता कोणतीही समस्या नाही. अशी घटना येथे यापूर्वी कधीही घडली नसल्याचे स्थानिकाने म्हटले.
त्याच वेळी, आणखी एका स्थानिक व्यक्तीने मुलांच्या शिक्षणावर होणाऱ्या परिणामाबद्दल चिंता व्यक्त केली. “आज १० दिवसांनी शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. हिंसाचारामुळे विद्यार्थ्यांसाठी शाळा आणि शिकवण्या बंद होत्या. याचा त्यांच्या अभ्यासावर खूप परिणाम होणार आहे,” असे स्थानिक देव कुमार साहा म्हणाले.
हे ही वाचा :
झारखंडमध्ये एक कोटींचे बक्षीस असलेल्या नक्षल नेत्यासह आठ नक्षलवाद्यांचा खात्मा
खलिस्तान्यांकडून तिसऱ्यांदा ब्रिटिश कोलंबिया येथील हिंदू मंदिराची तोडफोड
हुथी बंडखोरांवरील हल्ल्याच्या योजना अमेरिकेच्या संरक्षण सचिवांनी कुटुंबियांसोबत केल्या शेअर?
उद्धव यांच्या अटी मनसैनिकांना कुठे पटतायत ?
२९० लोकांना अटक करण्यात आली
मुर्शिदाबाद झालेल्या हिंसाचाराची एसआयटी चौकशी करत आहे. एसआयटीच्या तपासात समोर आले आहे कि ३५ दहशतवाद्यांनी बॉर्डरपार कडून मुर्शिदाबादमध्ये दहशत निर्माण केली. हे सर्व दहशतवादी बांगलादेशच्या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटने अन्सारुल्ला बांगला टीमचा भाग आहेत. एसआयटीने पुढे म्हटले आहे की हिंसाचार प्रकरणात अटक सुरूच आहे. या प्रकरणात आतापर्यंत २९० जणांना अटक करण्यात आली आहे. आज या प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयातही सुनावणी होणार आहे.
#WATCH | Murshidabad, West Bengal | Everyday life gradually resumes amid tight security in Murshidabad after violence erupted in various areas during the protests against the Waqf (Amendment) Act on April 11 pic.twitter.com/pgtIrkOUW6
— ANI (@ANI) April 21, 2025