‘हिंदूंची कत्तल होतेय आणि खासदार युसूफ पठाण चहाचा आनंद घेतोय!’

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांची टीका 

‘हिंदूंची कत्तल होतेय आणि खासदार युसूफ पठाण चहाचा आनंद घेतोय!’

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये वक्फ दुरुस्ती विधेयकावरून हिंसाचार उसळला असताना, स्थानिक खासदार आणि माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केल्याबद्दल टीकेचा सामना करावा लागत आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार युसूफ पठाण यांनी इंस्टाग्रामवर चहा पिताना एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने ‘चांगला चहा’ असे लिहिले. तथापि, मुर्शिदाबादमधील बहुतेक हिंसाचारग्रस्त भाग युसूफ पठाण यांच्या लोकसभा मतदारसंघाचा भाग नाहीत. तरीही, युसूफ पठाणच्या या पोस्टवर लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, युसुफ पठाणचा बहरामपूर लोकसभा मतदारसंघ आहे.

पठाणने दोन दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर तीन फोटो शेअर केले होते ज्यात कॅप्शन होते, “आरामदायी दुपार, चांगला चहा आणि शांत वातावरण. फक्त क्षणाचा आनंद घेत आहे.” या पोस्टनंतर लगेचच सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. लोक म्हणतात की मुर्शिदाबादमध्ये हिंसाचार झाला आहे आणि ते चहा पित आहेत. एका वापरकर्त्याने विचारले, “तुम्हाला काही लाज आहे का?”

हे ही वाचा :  

पवन कल्याण यांच्या मुलाला भारतीय कामगारांनी वाचवले, सिंगापूर सरकारकडून सन्मान

८५० बैल आणि ३५० बुलफायटर्सचा पराक्रम बघा

शुक्रवारी जुम्मा नमाजानंतर मुर्शिदाबादमध्ये हिंदू लक्ष्य, हिंदूंचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर

काँग्रेसच्या कन्हैय्याकुमारचे नरेंद्र मोदी, अमित शहा, रा.स्व. संघाविरोधात आकांडतांडव

दुसरीकडे, भाजपने तृणमूल खासदाराला लक्ष्य केले आणि ममता बॅनर्जी सरकारवर हिंसाचाराला प्रोत्साहन देण्याचा आरोप केला. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी ट्वीटकरत टीएमसी आणि युसूफ पठाणवर टीका केली. ते म्हणाले, बंगाल जळत आहे. उच्च न्यायालयाने म्हटले आहे की ते डोळे बंद करून राहू शकत नाही आणि केंद्रीय सैन्य तैनात केले आहे. ममता बॅनर्जी यांच्याकडून हिंसाचाराला प्रोत्साहन दिले जात आहे, पोलीस गप्प आहेत. अशावेळी युसूफ पठाण – खासदार चहाचा घोट घेत आहेत आणि हिंदूंची कत्तल होत असतानाच्या क्षणांचा आनंद घेत आहेत. ही तृणमूल काँग्रेस आहे, अशी टीका शहजाद पूनावाला यांनी केली.

तहव्वूरमुळे श्वास कोंडलाय, दाऊदला आणले तर काय होईल? | Dinesh Kanji | Tahawwur  Rana | Congress |

Exit mobile version