पुणे लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे विजयी ठरले आहेत.मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर आणि वंचितच्या वसंत मोरेंचा पराभव केला आहे.मुरलीधर मोहोळ यांच्या विजयीने पुण्यात कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे.
पुणे लोकसभा मतदार संघात भाजप, काँग्रेस आणि वंचित अशी तिरंगी लढत पाहायला मिळाली.महायुतीकडून भाजपने मुरलीधर मोहोळ याना उमेदवारी दिली होती.तर या ठिकाणी महाविकास आघाडीने काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांना उभे केले होते.तसेच या दोघांच्या लढतीमध्ये मनसेमधून बाहेर पडलेले वसंत मोरे यांनी वंचितकडून निवडणूक लढवली होती.मात्र, या जागेवर महायुतीच्या मुरलीधर मोहोळ यांनी दणदणीत विजय मिळविला आहे.
हे ही वाचा:
घोषणा ‘४०० पार…’ची निकाल ३०० च्या आत… भाजपाचे गणित कुठे चुकले?
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये खणखणीत राणेंचे नाणे!
वाराणसीतून नरेंद्र मोदींची विजयी हॅट्रिक!
मुरलीधर मोहोळ हे तब्बल १ लाख १८ हजार मतांनी विजयी झाले आहेत.भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना पहिल्या फेरीपासून आघाडी मिळाली. विशेषतः शहरी भागात मोहोळ यांना मोठ्या प्रमाणात मतदान झालं. शहरी भागातून मतदान मिळवण्यास घंगेकर कमी पडल्याचं पाहायला मिळालं.तर दुसरीकडे वंचित आघाडीचे उमेदवार वसंत मोरेही या मदतीत टिकले नाही. वसंत मोरेंना चांगली मते मिळतील अशी आशा होती. मात्र त्यांना २५ हजार मतेही मिळाली नाहीत.