देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून मुंबई महापालिकेचा बोलबाला आहे. परंतु असे असले तरी महापालिकेच्या बुडाखालीच अंधार आहे असे म्हणायला हवे. थकित निवृत्तीवेतन तसेच भविष्य निर्वाहनिधी मिळाले नसल्याप्रकरणी आता महापालिकेचे निवृत्त कर्मचारी मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत. २२ जूनला हा मोर्चा निघणार असून यामध्ये ३ हजार सेवानिवृत्त कर्मचारी सहभागी होतील. महापालिकेच्या मुख्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे.
गेल्या दोन वर्षांपासून थकीत निवृत्तवेतन आणि भविष्य निर्वाहनिधीपासून ३ हजार सेवानिवृत्त कर्मचारी वंचित राहिले आहेत. इतकी वर्षे इमानेइतबारे सेवा करून हातात मात्र काहीच न आल्यामुळे अखेर या सर्वांना मोर्चा काढण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. म्युनिसिपल मजदूर युनियनच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे.
पालिका कर्मचारी वर्गाची निवृत्त झाल्यानंतरची देय रक्कम तातडीने देणे बंधनकारक असतानाही ही रक्कम देण्यात आली नाही. त्यामुळे स्वतःच्या हक्काची रक्कम मिळवताना आता या निवृत्त कर्मचारी वर्गाची दमछाक होत आहे. सतत केलेला पाठपुरावा या सर्व गोष्टींचा काहीच उपयोग झालेला नाही. पालिकेचे उंबरठे झिजवून काहीच उपयोग होत नसल्यामुळे अखेर या निवृत्त कर्मचारी वर्गाला मोर्चाशिवाय पर्याय उरलेला नाही.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरेंचे सरकार हे गुंड सरकार
तुमचा उद्धव मोदी साहेबांसमोर नाक घासून आला आहे
एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर एनआयएचे छापे
शिवसेनेने आता सामना बंद करून बाबरनामा काढावा
युनियनच्या वतीने पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना निवेदन देण्यात आलेले आहे. यावर आयुक्तांनी बैठकीचे आश्वासन दिलेले आहे. परंतु यातून तोडगा न निघाल्यास हजारो निवृत्त कर्मचारी पालिका मुख्यालयावर धडकणार आहेत.
हक्काची देय रक्कम मिळत नसल्यामुळे अनेकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याएकूणच परिस्थितीत सर्व कर्मचारी आता चांगलेच चिडलेले आहेत. देणी न मिळाल्यास हे आंदोलन अधिक तीव्रपणे करण्यात येईल असा इशाराच आता पालिकेला देण्यात आलेला आहे.