26 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरविशेषउबाठा गटाच्या नेत्याचे अचानक निधन झाल्यानंतर अर्नाळ्यातील रिसॉर्टस पाडले!

उबाठा गटाच्या नेत्याचे अचानक निधन झाल्यानंतर अर्नाळ्यातील रिसॉर्टस पाडले!

मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्देशानंतर महापालिकेची कारवाई

Google News Follow

Related

वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील अर्नाळा बीचनजीकच्या अनधिकृत रिसॉर्टसवर महानगरपालिकेने हातोडा चालवला आहे. बीचच्या परिसरातील सर्व अनधिकृतपणे चालणारी रिसॉर्टस जमीनदोस्त करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. महानगरपालिकेच्या वतीने तातडीने ही तोड कारवाई सुरू करण्यात आली आहे.

शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचे पुत्र, उबाठा गटाचे माजी उपशहरप्रमुख आणि माजी परिवहन समिती सदस्य मिलिंद मोरे यांचे काल दुःखद निधन झाले. मिलिंद मोरे काल (२८ जुलै) आपल्या कुटूंबासह अर्नाळा बिच येथील रिसॉर्टवर गेले असता तिथे स्थानिक नागरिकांशी झालेल्या वादातून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात झालेल्या दुखापतीमुळे अचानक हृदरविकाराचा झटका येऊन त्यात त्यांचे दुःखद निधन झाले. ही बातमी ठाण्यात वाऱ्यासारखी पसरली त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोरे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी कुटूंबियाकडून झालेला प्रसंग समजल्यावर मुख्यमंत्र्यांनी या घटनेची तत्काळ दखल घेऊन या भागातील सर्व अनधिकृत रिसॉर्टसवर हातोडा चालवण्याचे निर्देश वसई-विरार पालिका आयुक्तांना दिले.

हे ही वाचा:

पुणे; वाघाच्या कातड्याची तस्करी करणारी टोळी गजाआड !

ब्राह्मणांना टार्गेट करून ऐक्य निर्माण होईल?

त्रिपुरा: बांगलादेशी-रोहिंग्या घुसखोरांना अटक !

हिंदू तरुणाची धारावीत धारदार शस्त्राने हत्या, विश्व हिंदू परिषदेची पोलीस ठाण्यासमोर आंदोलन

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार या भागातील रिसॉर्टसवर कारवाई सुरू झाली असून काही रिसॉर्टसचे बांधकाम पालिकेच्या वतीने जमीनदोस्त करण्यात आले आहे. या भागात अनधिकृतपणे सुरू करण्यात आलेल्या या रिसॉरर्ट्सच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी अनेकदा पालिका प्रशासनाकडे तक्रार करून ती बंद करावीत अशी मागणी केली होती. मात्र आज अखेर मुख्यमंत्र्यांनी या रिसॉर्टसच्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर या कारवाईला गती आली आहे. सकाळपासून पलिकेने या रिसॉर्टसह अनेक अनधिकृत रिसॉर्टसवर तोडक कारवाई केली असून ही कारवाई यापुढेही चालु राहणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा