वरळी हिट अँड रन प्रकरणी सील करण्यात आलेल्या बार वर महापालिकेने कारवाई केली आहे. बारच्या अनधिकृत बांधकामावर पालिकेने तोडक कारवाई केली आहे. कारवाईदरम्यान महापालिकेचे कर्मचारी आणि पोलीस उपस्थित होते.
जुहूतील ग्लोबल तपस बारच्या अतिरिक्त अवैध बांधकामावर पालिकेने हातोडा चालवला आहे. वरळी हिट अँड रन प्रकरणी मुख्य आरोपी मिहीर शाहने अपघातापूर्वी याच बारमध्ये दारू पिल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले होते. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत काल ( ९ जुलै) बार सील केले. बारचालकाकडून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली होती. यानंतर आज महापालिकेने देखील बारच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोजर चालवला आहे.
हे ही वाचा:
उत्तर प्रदेशात बसची दुधाच्या टँकरला धडक; अपघातात १८ जणांचा मृत्यू
दारू पिऊन वाहन चालवल्यास लायसन्स होणार रद्द
मराठवाड्यासह विदर्भाला ४.२ रिश्टर स्केल भूकंपाचा बसला धक्का
फ्रान्समध्येही टॅक्टीकल वोटींगचा बोलबाला… फ्रेन्च खिचडी शिजणार का?
दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहला मुंबई पोलिसांच्या पथकाने काल शहापूरमधून अटक केली होती. त्याच्यासह १२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अटक करण्यात आलेल्यांमध्ये आरोपीच्या आईचा आणि बहिणीचाही समावेश होता. आरोपी मिहीर शाह सध्या पोलिसांच्या ताब्यात असून आज त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.