डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्याच्या कामाला असहकार्य करणाऱ्या सुमारे १२० सोसायट्या, घरमालकांवर महापालिकेने गुन्हे दाखल केले आहेत. जानेवारी ते मे या कालावधीत ही कारवाई करण्यात आली आहे. न्यायालयाकडून अशा सोसायट्या, घरमालकांना दंडही ठोठावण्यात आला आहे. त्यांच्याकडून सुमारे ३ लाख ८२ हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत.
महापालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून पावसाळापूर्व तयारीसाठी जानेवारीपासूनच उपाययोजना करण्यात येतात. डासांची पैदास होऊ नये, यासाठी पाण्याच्या टाक्या डास प्रतिबंधक करणे, अडगळ काढणे अशा विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत असतात. मलेरियाला प्रतिबंध करण्यासाठी शहरातील १८ हजार १९९ ठिकाणी तपासणी करण्यात आली. यात १ हजार ८६० ठिकाणी प्रत्यक्ष मलेरियाचा प्रसार करणारी डासांची उत्पत्तीस्थाने आढळली आहेत. डेंग्यूची उत्पत्तीस्थाने चाळ, झोपडपट्टी असते.
मागील पाच महिन्यांत ४० लाख ३३ हजार १०८ घरांची तपासणी करण्यात आली. त्यात १९ हजार २५२ घरांमध्ये प्रत्यक्ष डेंग्यूच्या आळ्या आढळल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जानेवारी ते मे या काळात ३ हजार ७३८ सोसायटी, घरमालकांना नोटीस बजावण्यात आली आहे. यातील १२० सोसायटी, घरमालकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
गुजरातला शुभमन शकून! तिसरे शतक, ८५१ धावा
शिवसेना पदाधिकारी शब्बीर शेखची भोसकून हत्या
‘आशिष विद्यार्थीने माझी कधीही फसवणूक केली नाही’
पाण्यात पडलेला फोन काढण्यासाठी २१ लाख लीटर पाणी काढून टाकले, अधिकारी निलंबित
पश्चिम उपनगरातील १२६ इमारती धोकादायक
मुंबईतील सी-१ श्रेणीतील अतिधोकादायक आणि मोडकळीस आलेल्या २२६ इमारतींची यादी महापालिकेकडून जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक इमारतींची संख्या १२६ इतकी पश्चिम उपनगरातील आहे. यासह शहर विभागात ३५, पूर्व उपनगरात ६५ इमारतींचा समावेश आहे. या इमारतींमधील रहिवाशांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरीत व्हावे, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
पावसाळ्यात पाणी मुरल्यानंतर अनेकदा इमारती कोसळण्याच्या घटना घडतात. अशा घटनांमध्ये निष्पापांचे बळी जातात. इमारती धोकादायक म्हणून घोषित केल्यानंतरही अनेकजण त्याच इमारतीमध्ये रहात असल्याचे दिसून येते. त्यामुळे धोकादायक इमारतींमध्ये राहणाºयांनी तत्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतरीत व्हावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.