नाशिकमध्ये अनधिकृत थडगा हटवत नसल्यामुळे सकल हिंदू समाजाकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. तसेच २५ वर्षांपासून पाठपुरावा करूनही अनधिकृत थडगे न काढल्याने हिंदू समाज या थडग्यासमोर हनुमानाचे मंदिर उभारणार होते. दरम्यान, आंदोलनाचा इशारा मिळताच आता अनधिकृत थडग्यावर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई सुरू आहे.
नाशिक- पुणे रोडवरील काठे गल्ली परिसरातील अनधिकृत थडगा २५ वर्षे पाठपुरावा करून ही महापालिका हटवत नसल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. सकल हिंदू समाजाने पुकारलेल्या या आंदोलनात भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले सहभागी होणार होते. तसेच “जेथे रस्त्यात दिसतील थडगे त्याच्या पुढे उभे राहतील बजरंग बलीची मंदिरे!” अशी हाक हिंदू संघटनांकडून देण्यात आली आहे. आज होणाऱ्या आंदोलनापूर्वीचं आता काठे गल्ली परिसरातील अनधिकृत थडगा हटविण्याच्या कारवाईला महापालिका प्रशासनाकडून सुरुवात झाली आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तात हे काम केले जात आहे. राज्य राखीव दलाची पथकेही घटनास्थळी तैनात करण्यात आली आहेत.
हे ही वाचा..
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी
महाकुंभात महिलांचे स्नान करतानाचे व्हिडीओ युट्युबवर अपलोड प्रकरणी; तिघांना अटक
संभल हिंसाचार : १२ पैकी ६ प्रकरणात आरोपपत्र दाखल
मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी विशेष पाहुणे
दरम्यान, या परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न जटिल होऊ नये म्हणून शहर पोलिसांनी मुंबई नाका व भद्रकाली पोलिसांच्या हद्दीतील काठे गल्लीसह द्वारका भागात शनिवारी जमावबंदी लागू केली आहे. तसेच शनिवारी पुणे रोडवरील द्वारका ते काठे गल्ली आणि आसपासचे अनेक रस्ते कायदा व सुव्यवस्था आणि वाहतुकीच्या कारणास्तव बंद करण्यात आले आहेत.