धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं….

दोषींवर कारवाई केली जाणार

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं….

संतोष देशमुख हत्येप्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेला वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय मानला जातो. त्यामुळे विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. दरम्यान, या प्रकरणावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. पुराव्या शिवाय कोणावरही आरोप करणे कितपत योग्य आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

या प्रकरणाचा सध्या एटीएस, सीबीआय पथकाकडून तपास सुरु आहे. आतापर्यंत अनेक आरोपींना अटक करण्यात आली असून प्रकरणाशी संबधित आरोपींचा शोध सुरु आहे. यामध्ये खंडीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या वाल्मिक कराडमुळे मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव घेतले जात आहे. वाल्मिक कराडच्या डोक्यावर मंत्री मुंडेचा हात असल्याचा आरोप करत प्रकरणाशी त्यांचा संबंध जोडला जात आहे. यावरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यावर  आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही स्पष्ट केले आहे. प्रकरणाशी संबंधित आरोपींवर कारवाई करण्यात येईल, कोणाचीही गय केली जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

हे ही वाचा : 

मंडलने मारली होती बंडल, ‘फातिमा शेख’ अस्तित्वातच नाही!

निज्जरच्या हत्येतील भारतीय आरोपींना जामीन

उद्योगविषयक धोरणांमध्ये कालानुरूप बदल करावेत

महाकुंभमेळ्यापूर्वी प्रयागराजमध्ये घनदाट जंगल तयार करणार

मंत्री मुंडेंच्या राजीनाम्यावर एवढा वेळ का लागत आहे, त्यांना पाठीशी कोण घालत आहे?. असा प्रश्न विचारला असता उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, प्रकरणाची एसआयटी, सीआयडी आणि न्यायालायीन चौकशी सुरु आहे. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल, संबंधित असेल हे सिद्ध झाल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल. ते पुढे म्हणाले, पक्ष वैगैरे न बघता, जर वरिष्ठ लेवलला काम करत असलेला व्यक्ती जर दोषी असेल तर कोणाचीही गय केली जाणार नाही. त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.

कोणत्याही एजन्सीला तपास करायला सांगा, या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचे मत आहे. अशी एक एखादी व्यक्ती ठामपणे सांगते. त्यामुळे कुणा दोषींवर पण अन्याय होता कामा नये, असे अजित पवार म्हणाले.

महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या घटना खपवून घेणार नाही. सत्ताधारी आणि विरोधकांना बोलण्याचा अधिकार आहे. पण, कोणावर अन्याय होईल याचीही खबरदारी घेणे गरजेचे आहे. दोषींना पाठीशी घालणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. पुराव्या शिवाय कोणावरही आरोप करणे कितपत योग्य आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

Exit mobile version