25 C
Mumbai
Tuesday, November 26, 2024
घरविशेष'मम्मी, पापा, मी जेईई पास होऊ शकत नाही, राजस्थान येथील १८ वर्षीय...

‘मम्मी, पापा, मी जेईई पास होऊ शकत नाही, राजस्थान येथील १८ वर्षीय मुलीची आत्महत्या!

सुसाईड नोटमध्ये कारण लिहत उचललं टोकाचं पाऊल

Google News Follow

Related

राजस्थान मधील कोटा येथे एका १८ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.जेईईची परीक्षा पास होऊ शकत नसल्याने हे पाऊल उचलत असल्याचे मुलीने सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे.दरम्यान, परीक्षेच्या दोन दिवस आधी तिने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

परीक्षेचा ताण आणि वाढत चाललेली स्पर्धा यामध्ये आजचा विद्यार्थी आपल्याच दुनियेत गुरफटत चालला आहे.आई वडिलांचा दबाव, स्पर्धेत टिकण्यासाठी कोचिंग सेंटर्स, एक्सट्रा लेक्चर यामुळे विद्यार्थ्यांवर मोठा ताण निर्माण होत आहे. हा ताण सहन न झाल्यामुळे अनेक विद्यार्थी दुसरा मार्ग निवडतात.तशीच घटना सोमवारी २९ जानेवारी रोजी राजस्थानच्या कोटामधील बोरखारा पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली.जेईईची परीक्षा देणाऱ्या एका १८ वर्षीय विद्यार्थिनीने सुसाइड नोट लिहत आत्महत्या केली.

हे ही वाचा:

पंतप्रधानांच्या परीक्षे पे चर्चा कार्यक्रमात २ कोटी विद्यार्थांचा सहभाग

लोकसभेपूर्वी राज्यसभेच्या निवडणुकीची तारीख ठरली!

भगव्या झेंड्यावरुन कर्नाटकात काँग्रेस-भाजप आमनेसामने!

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लांबणीवर!

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी या मुलीच्या पालकांनी तिच्या खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला.परंतु बराच वेळ झाल्याने मुलीने काहीच प्रतिक्रिया न दिल्यामुळे पालकांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला.दरवाजा उघडताच आई वडिलांना एकच धक्का बसला.त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.त्या मुलीने आपल्या आई वडिलांसाठी सुसाईड नोट लिहून ठेवली होती.या सुसाईड नोटमध्ये JEE परीक्षेचा उल्लेख केला होता.

सुसाईड नोटमध्ये विद्यार्थिनीने लिहिले की, “आई-बाबा, मी JEE परीक्षा पास होऊ शकत नाही. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. मी एक लूजर आहे. मी एक वाईट मुलगी आहे. आई-बाबा, मला माफ करा. हा एकच पर्याय उरला आहे”, असं या नोटमध्ये लिहिले आहे.दरम्यान, या विद्यार्थिनीची ३१ जानेवारी रोजी JEE (Joint Entrance Examination) ची परीक्षा होती.परीक्षेच्या दोन दिवस अगोदर तिने टोकाचे पाऊल उचलले.पोलिसांकडून ही सुसाईड नोट जप्त करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
198,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा