मुंबईतील पवई तलावाच्या संवर्धनासाठी केलेल्या प्रकल्पासाठी मुंबईकर अयान शंक्ता या अवघ्या १२ वर्षाच्या मुलाला जागतिक पातळीवर गौरवण्यात आले आहे. ‘अॅक्शन फॉर नेचर’ या संस्थेने पर्यावरणवादी कार्यकर्ता असलेल्या अयान याला ‘२०२१ इंटरनॅशन यंग इको हिरो’ हा सन्मान प्रदान केला आहे. जगभरातील २५ तरुण कार्यकर्त्यांना हा पुरस्कार देण्यात आला त्यांच्यापैकी अयान हा एक आहे.
अयानला त्याच्या ‘पवई तलावाचे संवर्धन आणि पुनर्वसन’ या प्रकल्पासाठी आठ ते चौदा वर्षे या वयोगटात तिसरा क्रमांक मिळाला. एकेकाळी पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत असलेला पवई तलाव आता कचरा आणि सांडपाणी सोडण्याची जागा बनला आहे. या तलावाचे पुनरुज्जीवन व्हावे असे उद्दिष्ट असल्याचे अयान याने सांगितले. प्रदूषणाबाबत जागृती व्हावी, तलाव स्वच्छ व्हावा, त्याच्या परिसंस्थेचे रक्षण व्हावे, ही अयानच्या प्रकल्पाची उद्दिष्टे आहेत.
हे ही वाचा:
सावरकर स्मारकात आता शिकविली जाणार तलवारबाजी
मालमत्ता खरेदी लोक चालले दक्षिण मुंबईला!
जागा हडप करण्यासाठी वाजवले जातात फटाके…
भारत-इंग्लंड मालिका २-२ बरोबरीत नाही, वाचा सविस्तर…
पवई तलावाच्या सफाईसाठी आणि जागरुकतेसाठी अयान एका स्वयंसेवी संस्थेसोबत काम करत असून त्याने तलावाच्या स्थितीविषयी कृती अहवालही तयार केला आहे. सध्या तो पवई तालावासंबंधी माहितीपट तयार करण्याच्या कामात व्यस्त आहे.