दिल्लीत मानवतेला लाजवेल अशा पद्धतीने एका मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही हत्या लव्ह जिहादच्या संशयावरून झाल्याचा संशय व्यक्त होतोय. मुंबईतून दिल्लीत आल्यानंतर आफताब अमीन पूनावाला याने श्रद्धा वाकर हिची हत्या केली. हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे त्याने केले. आफताब रात्री २ वाजता हे तुकडे पिशवीत घेऊन जंगलात व शहरातील विविध भागात टाकत असे. सुमारे १८ दिवस मृतदेहाच्या तुकड्यांची त्याने विल्हेवाट लावली.
मुंबईतील मालाडमध्ये श्रद्धा कॉल सेंटरमध्ये काम करत होती. तिथे तिची आफताब अमीन पूनावाला याच्याशी ओळख झाली. दोघेही एकमेकांना पसंत करू लागले आणि लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. श्रद्धाच्या परिवाराकडून विरोध वाढल्याने त्यांनी आपला मुक्काम मुंबईहून दिल्लीला हलवला.
दिल्लीत गेल्यावर मेहरौलीच्या छतरपूर भागात आपली मुलगी राहत असल्याचे वडिलांनी कळले. तिची माहिती कोणत्या ना कोणत्या माध्यमातून त्यांना मिळायची. परंतु कित्येक दिवस तिच्याशी संपर्क होत नव्हता. तिची माहिती मिळत नव्हती. फोन नंबरवरही तिला संपर्क साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र तोही बंद येत होता. मुलीच्या काळजीने त्यांनी ८ नोव्हेंबरला थेट ती राहत असलेल्या छतरपूर येथील घर गाठले. परंतु तेथे कुलूप बंद असल्यामुळे त्यांनी पोलिस स्थानक गाठले. अपहरणाची माहिती पोलिसांना दिली आणि तपास सुरू झाला.
गुन्हा दाखल होताच तपासाला वेग येऊन आफताबला अटक करण्यात आली. पोलिस चौकशीत आफताबने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. श्रद्धा लग्नासाठी अनेकदा दबाव टाकत होती. यावरून दोघांमध्ये वाद होत होते. त्यात १८ मे रोजी कडाक्याचे भांडण झाले असता आफताबने श्रद्धाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेहाचे करवतीने अनेक तुकडे त्याने केले. मृताचे तुकडे ठेवण्यासाठी स्थानिक बाजारातून टिळक इलेक्ट्रॉनिककडून ३०० लिटरचा फ्रीज विकत घेतला. त्यात त्याने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे ठेवले. आफताब रात्री दोन वाजता शरीराचे एक एक तुकडे प्लास्टिकच्या पिशवीत घेऊन फेकून देत असे. सुमारे १८ दिवस त्याने हे तुकडे फेकले होते. आरोपीने शेफचे प्रशिक्षण घेतले होते, त्यामुळे एखाद्या वस्तूचे तुकडे कसे करायचे याचे त्याला ज्ञान होते.
हेही वाचा :
डोंबिवलीतल्या मुलाचे अपहरण करणाऱ्यांत होत्या तीन महिला, सुखरूप सुटका
आंतरराष्ट्रीय विमानतळावर ६१ किलो सोन्याची जप्ती
आयसीसीच्या सर्वोत्तम संघात टीम इंडियाची बाजी
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या शिष्टाईमुळे कुवेतमध्ये अडकलेल्या युवकाची झाली सुटका
पोलिसांचे पथक आरोपीच्या जबानीच्या आधारे श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे शोधत आहेत. आरोपीने श्रद्धाची हत्या केल्यानंतर शरीराचे अवयव कुठे फेकले याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी एक-दोन ठिकाणांहून काही हाडे जप्त केली आहेत. उर्वरित ठिकाणीही पोलिस पोहोचून तपास करत आहेत. पोलीस चौकशीत असे समोर आले आहे की आरोपी आपल्या मैत्रिणीच्या मृतदेहाचे तुकडे घरात ठेवत होता आणि त्याने ही बाब कोणाला कळू दिली नाही. त्यांनी मृतदेहाचे तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवले होते आणि दुर्गंधी पसरू नये म्हणून फ्लॅटमध्ये अगरबत्ती जाळत असे.
श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फेकून दिल्यानंतर आफताब सामान्य जीवन जगत होता जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. आफताब रोज त्याच खोलीत झोपायचा. ज्या खोलीत श्रद्धाची हत्या झाली होती. हत्याकांडानंतर तो झोमॅटोवरून खाद्यपदार्थ मागवत असे. आफताबला श्रद्धाच्या हत्येचा कोणताही पश्चाताप नाही.