म्हातारीचा बूट ‘धोकादायक’

पालिकेचे असे म्हणणे आहे की हा बूट आता लहान मुलांच्या खेळण्यासाठी हानिकारक आहे.

म्हातारीचा बूट ‘धोकादायक’

‘म्हातारीचा बूट’ हे म्हटल्यावर बालपण आठवतं ना?? पण ते आता दुरुतीसाठी बंद करण्यात आले आहे. पालिकेचे असे म्हणणे आहे की हा बूट आता लहान मुलांच्या खेळण्यासाठी हानिकारक आहे. कमला नेहरू उद्यान हे २०१८ मध्ये दुरुस्तीनंतर उघडले होते.

मलबार हिलच्या शिखरावर हँगिंग गार्डन्समध्ये हा प्रतिष्ठित बूट पर्यटकांना पाहायला मिळतो. बऱ्याच शाळेतील मुलं इथे सहलीला येतात आणि मजा करतात. बागेत येणाऱ्या लोकांसाठी हा ‘म्हातारीचा बूट’ मुख्य आकर्षण ठरले आहे. पण आता त्यावर ‘धोकादायक’ असे चिन्ह लागले आहे. एका अहवालात स्थानिक उद्यान विभागाच्या कर्मचार्‍यांनी सांगितले की त्या बुटाचे बहुतेक भाग गंजले आहेत आणि ते कमकुवत आहेत. त्यातील लोखंडी जिना सुद्धा मोडकळीस आला आहे. पुढे जाऊन कोणत्याही लहान मुलांना दुखापत होऊ नये म्हणून आम्ही हा बूट बंद केला आहे. हायड्रोलिक अभियांत्रिकी विभागाकडून दुरुस्तीचे काम केले जात आहे. बूटावर ‘धोक्याचे’ चिन्ह लावलेले आहे आणि तात्पुरता ते बंद करण्यात आले आहे. ही नोटीस काही दिवसांपासून आकर्षणावर चिटकवले गेले आहे.

हे ही वाचा:

‘दोन बहिणीचं एकाच मुलाशी लग्न म्हणजे हिंदू संस्कृतीला काळिमा’

माजी राष्ट्राध्यक्ष कॅस्टिलो यांना तुरुंगात टाकल्यानंतर पेरूमध्ये आणीबाणी

अमित शहांचा सल्ला, ‘सीमाभागावर दावे नकोत’

धक्कादायक! दहा ते १७ वयोगटातील दीड कोटी मुले व्यसनाधीन

“पण काळजी करू नका, सर्व लहान मुलांना लवकरच म्हातारीचा बूटाची मजा घेता येईल. नूतनीकरणानंतर, त्याला नवीन रंग केला जाईल आणि अगदी नवीन रूपात म्हातारीचा बूट तुमच्या भेटीस येणार आहे “, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. याच सोबत आता कमला नेहरू पार्कला ही चकचकीत करण्यात येणार आहे. तर मुलांनो! नवीन चकचकीत म्हराटीचा बूट पाहायला येतंय ना??

Exit mobile version