मुंबईची ‘लाईफलाईन’ असलेली मुंबई लोकल ही १ फेब्रुवारीपासून सुरु झाली. परंतु मुंबई लोकलची वेळ मात्र अजूनही प्रवाशांच्या सोयीची नाही. सध्या मुंबई लोकल ही रात्री नऊ ते सकाळी सात आणि दुपारी बारा ते चार या वेळातच कार्यरत राहणार आहे. यावर तोडगा काढण्यासाठी २० तारखेला निर्णय घेण्यात येईल अशी माहिती मिळत आहे.
महाराष्ट्र सरकारमधील अनेक मंत्री ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यांपासून ‘पंधरा दिवसात लोकल सुरु होतील’ असे सांगत होते. मात्र प्रत्यक्षात सामान्यांसाठी लोकल सेवा सुरु व्हायला फेब्रुवारी महिना उजाडला. मात्र लोकल सेवा सुरु होऊनही चाकरमान्यांना याचा काहीही फायदा होत नसल्याचेच समोर आले आहे. कारण बहुतांश कार्यालयांच्या वेळा या सकाळी नऊच्या सुमारास सुरु होणाऱ्या आणि संध्याकाळी पाच नंतर संपणाऱ्या असतात. परंतु लोकलसेवा ही दिवसा केवळ बारा ते चार या वेळातच आहे. त्यामुळे लोकलसेवेची वेळसुद्धा पूर्वीप्रमाणे करण्याची मागणी वाढत आहे.
हे ही वाचा:
मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी या विषयावर बोलताना अशी माहिती दिली की, “वेळेचे निर्बंध कमी करण्याच्या विषयावर अजून आठवड्याभराने निर्णय घेण्यात येईल.”
सध्या आम्ही २० फेब्रुवारी नंतर या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे ठरवले आहे. पुनर्विचार प्रक्रियेनंतरच या विषयावर पुढील निर्णय घेण्यात येईल.