27 C
Mumbai
Monday, December 30, 2024
घरविशेषमुंबईकरांचे घराचे स्वप्न म्हाडाच्या माध्यमातून साकार

मुंबईकरांचे घराचे स्वप्न म्हाडाच्या माध्यमातून साकार

गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांचे प्रतिपादन

Google News Follow

Related

‘स्वप्न पूर्ण करणारे शहर’ म्हणून ओळख असलेल्या मुंबईत आपल्या हक्काचे घर असावे असे सर्वसामान्य नागरिकांचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य शासन म्हाडाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करीत असते. मुंबईकरांचे स्वतःच्या घराचे स्वप्न म्हाडाच्या माध्यमातून साकार होत असल्याचा मला आनंद आहे, असे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी केले.

म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत उभारण्यात आलेल्या २ हजार ३० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे काढण्यात आली. यावेळी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा..

ऑल्ट न्यूजचे मोहम्मद झुबेरविरोधात तक्रार दाखल

जम्मू- काश्मीरसह देशातील जनतेला कळून चुकलंय, देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीचं पर्याय

हिजबुल्ला मुख्यालयाचा कमांडर ठार

कांदिवलीतील आकुर्ली भुयारी मार्ग रुंदीकरणानंतर वाहतुकीसाठी खुला

मंत्री सावे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे प्रत्येकाला घर देण्याचे स्वप्न आहे. सर्वासाठी घरे हे स्वप्न साकार होण्यासाठी ‘प्रधानमंत्री आवास योजना’, ‘मोदी घरकुल आवास योजना’ सुरू केल्या आहेत. या माध्यमातून अल्प, मध्यम उत्पन्न गटातील सर्वसामान्यांना घरे वाटप करण्यात येत आहेत. राज्यात साडे सात लाख घरे बांधण्यात आली असून यातली अडीच लाख घर ही मुंबईमध्ये बांधली गेली आहेत. आजच्या या लॉटरीसाठी दोन हजार ३० घरांसाठी १ लाख १३ हजार पेक्षा जास्त अर्ज आले होते. आजची ही सोडत मानवी हस्तक्षेपविरहित संपूर्णत: ऑनलाईन अशा संगणकीय प्रणालीद्वारे प्रक्रिया राबविण्यात आली आहे.

नाशिक, पुणे, कोकण, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या शहरात पारदर्शकपणे लॉटरी प्रक्रियेमार्फत लोकांना घरे मिळाली आहेत. मुंबई शहर आणि परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. त्यामुळे घरांची मागणी ही वाढत आहे. मुंबईत ही दुसरी सोडत असून लवकरच आणखी घरांची सोडत होईल. अभ्युदय नगर, कामाठीपुरा, शहरातील जुन्या वस्त्या येथील पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागत आहे. राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच आणले जाणार असून गृहनिर्माण धोरणामध्ये परवडणाऱ्या व टिकाऊ घरांवर भर दिला जाणार असल्याचे मंत्री श्री. सावे यांनी यावेळी सांगितले.

म्हाडाच्या या लॉटरीमुळे मुंबईत सर्वसामान्य नागरिकांना घर मिळणार आहे. म्हाडाने मुंबईतील सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम केले असल्याचे मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा