टाळेबंदीच्या धास्तीने मुंबईकरांची जास्तीची खरेदी

टाळेबंदीच्या धास्तीने मुंबईकरांची जास्तीची खरेदी

महाराष्ट्रात कोविडच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दररोज मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ होत आहे. जर लोकांची गर्दी कमी झाली नाही तर लॉकडाऊन लावावा लागेल असे सरकारकडून वारंवार सांगितले जात आहे. मात्र यामुळे प्रत्यक्षात उलटेच पहायला मिळत आहे. टाळेबंदीच्या धास्तीने लोकांनी जास्तीत जास्त खरेदी आधीच करून ठेवायला सुरूवात केली आहे.

टाळेबंदाबाबत भीती दाखवल्याने लोकांनी अधिकाधीक खरेदी करायला सुरूवात केली आहे. त्यामुळे बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी मात्र वाढत आहे.

हे ही वाचा:

टाळेबंदीच्या भीतीने मजूरांचे ‘गड्या आपुला गाव बरा’!

कुर्ल्यात साजरा होतोय डिजिटल गुढी पाडवा

भारताला ‘हिंदूराष्ट्र’ घोषित करावे

क्राईम ब्रांच पाठोपाठ आता इओडब्ल्युच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

सोमवार सकाळपासूनच लोकांनी अन्नधान्य आणि विविध दुकानांसमोर रांगा लावून खरेदी करायला सुरूवात केली. मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी गर्दी असली तरीही, लोकांच्या मनात धास्ती मात्र नक्कीच होती. काहींच्या मनात, सरकार टाळेबंदी करणार नाही अशी आशा देखील होती.

फ्री प्रेस जर्नल या वेबपोर्टलवर असलेल्या सविस्तर वृत्तानुसार मालाडच्या एका व्यक्तीने सांगितले की, वीकेंड लॉकडाऊनमुळे दुकाने बंद होती, परंतु आता सोमवारी खुली झाल्यानंतर आम्ही आमच्या वस्तू खरेदीसाठी आलो आहोत.

आणखी एका नागरिकाने नोंदवलेल्या प्रतिक्रियेनुसार, कालपर्यंत आम्हाला कल्पना नव्हती की लॉकडाऊन होणार की नाही. परंतु आम्हाला कोणताही धोका पत्करायचा नसल्याने आम्ही शक्य तेवढ्या वस्तू गोळा करून ठेवत आहोत.

मुंबईकरांनी केवळ अन्नधान्य जसे की कडधान्ये, तांदूळ, डाळी यांच्या सोबतच ड्रायफ्रुट्स, स्नॅक्स, अंडी यांची देखील भरघोस खरेदी करायला सुरूवात केली आहे. अनेकांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या कुटुंबातील लोक घरूनच काम करत आहेत, त्याबरोबरच इतर शहरात राहणारे लोक देखील कोविड रुग्ण वाढल्यामुळे घरी परतले आहेत. त्यामुळे नेहमीपेक्षा जास्त अन्नाची गरज सध्या निर्माण झाली आहे.

एकंदरीतच शहरामध्ये टाळेबंदीच्या धास्तीमुळे चिंतेचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version