दिल्लीपाठोपाठ मुंबईला प्रदूषणाचा विळखा बसत असतानाच यंदा मुंबईत मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने फटाके फोडण्यावर काही निर्बंध घालून दिले होते मात्र, या आदेशांकडे दुर्लक्ष करून मुंबईकरांनी जोरदार फटाके फोडले. याचं पार्श्वभूमीवर मुंबईत फटाक्यांची जोरात विक्री झाली. मुंबईत दिवाळीसाठी आतापार्यंत ५०० कोटींच्या फटाक्यांची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
पर्यावरणपूरक आणि फटाकेमुक्त दिवाळीचा नारा देण्यात येत असला तरी यंदा त्याचा फारसा काही परिणाम झाल्याचे मुंबईत दिसले नाही. फटाक्यांची आतषबाजी गेल्या वर्षाच्या तुलनेत वाढल्याचे दिसले. धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुंबईत सुमारे ४०० कोटींच्या फटाक्यांची विक्री झाल्याचा अंदाज आहे. दोन दिवसांत त्यातील १५० कोटी रुपयांचे फटाके वाजले. आतापर्यंत एकूण ५०० कोटी रुपयांच्या फटाक्यांची आतषबाजी झाली आहे. त्यामध्ये बॉम्ब आणि सुतळी बॉम्बसह आकाशात उडणाऱ्या रॉकेट फटाक्यांचा अधिक आनंद घेण्यात आला आहे.
हे ही वाचा:
उत्तरकाशी बोगद्यातील कामगारांच्या बचावासाठी दिल्लीहून आले ‘ऑगर ड्रिलिंग मशीन’!
शेहला रशीद म्हणते, काश्मीर म्हणजे गाझा नाही, श्रेय मोदी, शहांचे!
ऐश्वर्या रायबाबत वादग्रस्त विधान; पाकिस्तानी क्रिकेटपटू अब्दुल रझ्झाककडून माफी!
न्यूजक्लिक प्रकरणी अमेरिकन उद्योजक नेव्हिल रॉय सिंघमला समन्स
फटाके विक्रेत्यांनी दिलेल्या महितीनुसार, गेल्या दोन-तीन वर्षांपासून चक्री, अनार आणि स्पार्कलर अशा एरियल प्रकारच्या फटाक्यांची विक्री तुलनेने कमी झाली आहे. त्याऐवजी मोठ्या आवाजातील फटाक्यांना मागणी वाढली आहे. महत्त्वाचे म्हणजे, आवाज करणाऱ्या फटाक्यांना यंदा मागणी वाढली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विषारी रसायने असलेल्या फटाक्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे. फटाके फोडण्यासाठी रात्री ८ ते १० अशी वेळ निर्धारित केली गेली आहे. मात्र, हा नियम पाळण्यात आलेला नाही. परिणामी दिवाळीच्या दिवसांत हवा प्रदूषणात वाढ झाल्यामुळे चिंताजनक एक्यूआयची नोंदही झाली आहे.