मुंबईकरांनो रेल्वेने रविवारी प्रवास करताय? मग लक्षात ठेवा…

रेल्वे विभागाने केले स्पष्ट

पश्चिम रेल्वेकडून विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनो रेल्वेने रविवारी प्रवास करताय, तर वेळेचे नियोजन करूनच बाहेर पडा. रविवार, ३१ मार्च या दिवशी चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल या स्थानकांदरम्यान सकाळी १० वाजून ३५ मिनिटं आणि दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांपर्यंत अप, डाऊन जलद मार्गावर तब्बल पाच तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणा  आणि देखभाल यांसह ओव्हरहेड वायरसरह इतर काही तांत्रिक कामांसाठी रेल्वे मार्गावरील रेल्वेसेवा खंडित राहणार आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर असणार्‍या या जम्बो ब्लॉक कालावधीत मुंबई सेंट्रल ते चर्चगेट या स्थानकांदरम्यान सर्व जलद मार्गावरील गाड्या धीम्या गतीने धावतील. तर काही उपनगरीय रेल्वेगाड्या पूर्णपणे रद्दही करण्यात येणार आहेत. नेहमी चर्चगेटपर्यंत जाणार्‍या काही रेल्वेगाड्यांचा प्रवास या दिवशी वांद्रे किंवा दादरपर्यंतच मर्यादित असेल. सध्याच्या घडीला रेल्वेकडून रद्द करण्यात आलेल्या ट्रेनची यादी स्टेशन मास्तरांच्या कार्यालयात देण्यात आल्याचे रेल्वे विभागाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा :

उत्तर प्रदेशातील तुरुंग बनले गुन्हेगारांचे कब्रस्तान

डीपफेक हे मोठं आव्हान; एआय जनरेटेड गोष्टींवर वॉटरमार्क हवा

रशियन सरकारने अटक केली सहा पत्रकारांना !

आयपीएलमध्ये राजस्थानचा सलग दुसरा विजय

मध्य रेल्वेकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार येथील पीआरएस प्रणाली अर्थात पॅसेंजर रिजर्वेशन सिस्टीमही बंद राहणार आहे. २८ मार्च २०२४ रोजी रात्री ११ वाजून ५ मिनिटांपासून २९ मार्च २०२४ पहाटे ४ वाजून ४५ मिनिटांपर्यंत रेल्वेकडून ही सेवा बंद ठेवली जाणार आहे. रेल्वे विभागाच्या माहितीनुसार मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, कोकण रेल्वे आणि पश्चिम मध्य रेल्वे विभागासाठी हा निर्णय लागू असेल. वरील नमूद वेळेदरम्यान रेल्वेसाठीची इंटरनेट तिकीट बुकींग, रिफंड, टच स्क्रीन, आयवीआरएस, कोचिंग टर्मिनल उपलब्ध नसतील याची प्रवाशांनी नोंद घ्यावी.

Exit mobile version