मुंबईमध्ये मोठा गाजा-वाजा करत बेस्टअंतर्गत विजेवर चालवण्यात येणारी एसी डबल डेक्कर बसचे उद्घाटन झाले होते. मात्र ही विजेवर चालणारी एसी डबल डेक्कर बस अद्याप ही प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली नाहीये. ही एसी डबल डेक्कर बस प्रवाशांकरीत चालविण्यासाठी पहिली सप्टेंबर व त्यानंतर ऑक्टोबरची मुदत देण्यात आली होती. प्रवाशांना अजूनतरी प्रतिक्षाच करावी लागणार आहे.
अद्याप ही विजेवर चालणारी बस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली नाहीये. कारण ही विजेवर चालणारी बस अजूनही चाचण्यांमध्येच अडकली आहे. तसेच सध्या बेस्ट उपक्रमामध्ये ४५ विनावतानुकूलित दुमजली बस आहेत. त्याचप्रमाणे एकमजली बसमधून ५४ ते ६० प्रवासी प्रवास करू शकतात. तर दुमजली बसची आसन क्षमता ७८ आहे. तर प्रवासी वाहून नेण्याची क्षमता सुद्धा अधिक असल्याने दुमजली वातानुकूलित बस टप्पाटप्प्याने प्रवाशांच्या सेवेत आणण्याचे निर्णय घेतला असून, त्यासाठी भाडेतत्वातवर ९०० बस टप्पाटप्प्याने घेण्यात येणार आहेत.
हे ही वाचा :
‘त्या’ ट्विटमुळे रिचा चढ्ढावर नेटकरी संपातले
विक्रम गोखले यांच्या मृत्यूचे खोटे वृत्त व्हायरल
दिशा सालियन प्रकरण सीबीआयकडे नव्हतेच, मग तो मृत्यू अपघाती असल्याचा दावा कुणाचा?
विजेवर चालणारी वातानुकूलित बसचे पुण्यातील एआरएआय म्हणजेच ऑटोमॅटिक रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया अंतर्गत या बसच्या चाचणीला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामध्ये २ ते ३ प्रकारच्या चाचणी पूर्ण झाल्या असूण सध्या त्यामधील एकही बस प्रवाशांच्या सेवेत अजून तरी दाखल करण्यात आलेल्या नाहीत. या संदर्भात माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी ही दिली.