30 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरविशेषखरेदीसाठी मुंबईकर निघाले ठाण्याला

खरेदीसाठी मुंबईकर निघाले ठाण्याला

Google News Follow

Related

मुंबईवरील जाचक निर्बंधांमुळे आता मुंबईकरांना ठाणे आणि नवी मुंबईच्या दिशेने खरेदीसाठी प्रस्थान करावे लागत आहे. मुंबई तिसऱ्या लेव्हलला असल्यामुळे अद्याप कोरोनाचे निर्बंध कायम आहेत, त्यामुळे मुंबईत दुपारी ४ नंतर दुकाने बंद होतात, तशी परिस्थिती ठाण्यात नाही. त्यामुळे आता यावर मुंबईकरांनी स्वतः तोडगा शोधला आणि ते ठाणे आणि नवी मुंबईकडे कूच करू लागले आहेत.

गरजेच्या वस्तू जवळपास मिळतात, परंतु काही आवडीच्या वस्तू घेण्यासाठी मॉल्समधील ब्रॅंडेड शोरूमशिवाय पर्याय नसतो. मुंबईवर अजूनही जाचक निर्बंध कायमच आहेत. शिवाय, लोकल रेल्वेही अजून सुरू नाही. त्यामुळे मुंबईकर त्रस्त होऊन उपनगरांकडे खरेदीसाठी धाव घेताना दिसतोय.

हे ही वाचा:
साफ न झालेल्या नाल्यांची दिली यादी

लसीकरण बोगस की बेकायदेशीर ? पाच जणांना अटक

‘फ्लाईंग सिख’ ने घेतला जगाचा निरोप

पुण्यात पुन्हा विकेंड लॉकडाऊन

शहरातील अनेक उपहारगृहे सुरु नाहीत.  त्यामुळे विकेंडला कुणालाही बाहेर पडता येत नाही. इतर काही खरेदीसाठी मॉल्समध्येही जाता येत नाही. त्यामुळेच आता ठाणे आणि नवी मुंबईमध्ये जाऊन मुंबईकर खरेदी करताना दिसत आहेत. ठाणे नवी मुंबईतील अनेक उपाहारगृहे आता सुरू झालेली आहेत. त्यामुळे क्षुधाशांतीचा मार्गही आता नवी मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने मुंबईकरांना सापडलेला आहे.

मुंबईच्या शेजारच्या या दोन्ही उपनगरांवरील उठवलेले निर्बंध या गोष्टीला कारणीभूत आहेत. या सर्व निर्बंधामुळे छोट्या व्यावसायिकांचे चांगलेच नुकसान झालेले आहे. शहरातील मॉल्स व मल्टिप्लेक्स पुन्हा सुरू करण्याची परवानगी नाही. तसेच संध्याकाळी ४ नंतर आणि शनिवार रविवार रेस्टॉरंटमध्ये जेवण बंद केलेले आहे. तुलनात्मक ठाणे, नवी मुंबईमध्ये मात्र मॉल्स, मल्टिप्लेक्स आणि रेस्टॉरंट्सला परवानगी देण्यात आलेली आहे.

मुंबईतील व्यापारी सरकारच्या या निर्णयावर चांगलेच नाराज आहेत. इंडियन हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशनने (एएचएआर) ही सांगितले की, निर्बंधांमुळे ठाणे आणि नवी मुंबईकडे अनेक मुंबईतील नागरिक जात आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
197,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा