मुंबईत पावसाळी आणि ढगाळ वातावरण

मुंबईत पावसाळी आणि ढगाळ वातावरण

गेल्या वर्षी महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर आता नुकतेच नवे वर्ष लागलेले असताना जानेवारी महिन्यातही पाऊस पाठ सोडण्याची चिन्हे दिसत नाही. मुंबईत शनिवारी सकाळपासूनच पावसाळी वातावरण होते.

हवेतला दमटपणा वाढला असून तापमान खाली घसरले आहे. कमाल तापमान २७ ते २८ अंश सेल्सियस इतके आहे. तर किमान तापमान १७ अंश सेल्सियस असेल. सकाळपासून मुंबई व आसपासच्या परिसरात असे पावसाळी वातावरण होते. काहीठिकाणी पावसाचा शिडकावाही झाला. मळभही दाटून आले आहे तर मध्येच सूर्यप्रकाश आणि पुन्हा ढगाळ वातावरण अशी स्थिती आहे. त्यामुळे आधीच कोरोनामुळे पिचलेल्या सर्वसामान्यांना नव्या आजारांची भीती वाटू लागली आहे.

दिल्लीत मात्र मुसळधार पाऊस आहे. शनिवारी पहाटे वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला होता. गुरग्राम, फरिदाबाद, मनेसार, वल्लभगड येथे पावसाने मोठी हजेरी लावली. हवामान खात्याने दिल्लीतील या पावसाबद्दल ट्विट केले होते.

हे ही वाचा:

‘ठाकरे सरकारचे कोविड सेंटर घोटाळे दहा दिवसांत बाहेर काढणार’

पाच राज्यांच्या निवडणूक कार्यक्रमांची थोड्याचवेळात घोषणा

भारतीयांना लवकरच ई-पासपोर्टची सेवा

चीनचा तो व्हिडीओ सैन्याचा नाहीच….

 

कोरोनाची सध्याची स्थिती बिकट झाली आहे. ओमिक्रॉनमुळे आधीच रुग्णांची संख्या वाढते आहे त्यात हवामानात झालेल्या या बदलांमुळे लोकांच्या चिंतेत नव्याने भर पडली आहे. बदलत्या वातावरणामुळे नव्या आजारांची भर तर पडणार नाही ना, अशी शक्यता व्यक्त होत आहे. त्यादृष्टीने पालिकेने कंबर कसली आहे.

 

Exit mobile version