आरोग्यसेवा रुग्णांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोलिसांना प्रशिक्षण
वाढत्या कोरोनाच्या काळात आरोग्यसेवा रुग्णाला पर्यंत पोहचवण्यासाठी तसेच आरोग्यसेवा पुरवठा केंद्राच्या मदतीसाठी मुंबई पोलीस दलात ३०० सुपर सेव्हर्स तयार करण्यात येणार आहे. या सुपर सेव्हर्सना केंद्रातील ‘राष्ट्रीय जन स्वास्थ प्रशिक्षण एवं अनुसंधान संस्थेकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
हे ही वाचा:
क्रिकेट बुकी जालान म्हणतो, परमबीर सिंह यांनी माझ्याकडून खंडणी उकळली
७० हजार कोटींच्या ठेवी असलेल्या पालिकेने मोफत लसीकरणाचा बोजा उचलावा
आरोग्य अधिकाऱ्याला शिवीगाळ, आमदार रणजीत कांबळेंविरुद्ध तक्रार दाखल
‘संजय राऊत आता देशाचा पंतप्रधानही ठरवतील’
आरोग्यसेवेअभावी कोरोना रुग्नांमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. या आरोग्यसेवा पुरवठा केंद्राला मदत करण्यासाठी मुंबईसह राज्यातील पोलीस दलात ‘सुपर सेव्हर्स’ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी राज्यासह मुंबई पोलीस दलातील प्रत्येक पोलीस ठाण्यात दोन सुपर सेव्हर्स नेमण्यात येणार आहेत. त्यासाठी मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यातून एक अधिकारी आणि एका पोलीस अंमलदार याची निवड करण्यात येणार आहे. या सुपर सेव्हर्स ची माहिती तात्काळ मागवण्यात आली असून ही नावे केंद्राच्या ‘राष्ट्रीय जन स्वास्थ प्रशिक्षण एवं अनुसंधान संस्थेकडे पाठवली जाणार आहे. ही संस्था पोलीस दलात सुपर सेव्हर्स तयार करून राज्यभर त्यांना आरोग्यसेवेसाठी तयार करणार आहे.
एकट्या मुंबई पोलीस दलात ३०० सुपर सेव्हर्स असतील व हे सुपर सेव्हर्स मुंबईतील आरोग्यसेवा पुरवठा केंद्राला मदत करतील. प्रत्येक पोलीस ठाण्यात २ सुपर सेव्हर्स असतील आणि ते आरोग्य सेवा पुरवठा केंद्राच्या संपर्कात असतील .या संस्थेकडून पोलिसांना बदलत्या कोरोनाच्या संक्रमणाबाबत माहिती देऊन त्यांना कोरोना रुग्ण हाताळणे, आरोग्यसेवेला मदत करणे, घरी विलगीकरणात असणाऱ्यांची माहिती आरोग्यसेवेला देणे, लसीकरण संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करणे अशा प्रकारचे प्रशिक्षण सुपर सेव्हर्स यांना देण्यात येणार आहे.