30 C
Mumbai
Monday, July 1, 2024
घरविशेषमुंबई 'दरड प्रवण क्षेत्र मुक्त' करणार!

मुंबई ‘दरड प्रवण क्षेत्र मुक्त’ करणार!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

Google News Follow

Related

‘दरड प्रवण क्षेत्र फ्री’ मुंबई करण्याचा आमचा संकल्प असून त्याची सुरुवात झाली आहे. दरड प्रवण क्षेत्राला सेफ्टी नेट बसवून पावसाळ्यात दरडी कोसळून होणारे नुकसान टाळण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. असल्फा येथील हनुमान टेकडी परिसरात मुख्यमंत्री शिंदे यांनी भेट देऊन सुरु असणाऱ्या कामाची पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, या पद्धतीचे काम पहिल्यांदाच मुंबईत होत आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ज्या प्रमाणे जाळ्या बसवण्यात आल्या आहेत तशाच पद्धतीने येथेही अशा जाळ्या बसवण्यात येत आहेत. सुमारे २५ फुट आता त्याचे बोल्टिंग करण्यात येत आहे. हे तंत्रज्ञान हे स्वीत्झर्लंडचे आहे. मुंबईमध्ये जवळजवळ ३१ ठिकाणे अशी शोधून काढण्यात आली आहेत. सर्वत्र हे काम युद्धपातळीवर सुरु आहे. यापूर्वी दरडी कोसळून झालेल्या अपघातात ७२ जणांचा मृत्यू झाला होता. सामान्य लोकांचा मृत्यू होऊ नये, यासाठी राज्य सरकार आणि मुंबई पालिका सज्ज असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा..

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या घरात ‘अतिक्रमण’ केल्याप्रकरणी चार जणांना अटक!

जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात चकमक; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

प्रेमजाळ्यात अडकवून एका हिंदू अल्पवयीन मुलीचा विनयभंग!

केनियात करवाढीला विरोध करताना संसद भवनावर हल्ला, १० ठार

धोकादायक ठिकाणच्या नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे. धोकादायक इमारती, एसआरए, झोपडपट्टी पुनर्वसनचे जी कामे रखडली आहेत, त्यावर सरकारच्या विविध एजन्सी ताब्यात घेतील आणि मुंबईकरांना हक्काचे घर मिळेल, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
163,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा