दोन वर्षात मुंबई खड्डेमुक्त करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ग्वाही

दोन वर्षात मुंबई खड्डेमुक्त करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ग्वाही

मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते दोन वर्षात खड्डेमुक्त करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दिली.संपूर्ण मुंबई खड्डेमुक्त करण्याची योजना येत्या काळात राबवण्यात येणार असून त्यानुसार सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे होतील यादृष्टीने तंत्रज्ञानाचा वापरण्यात करण्यात येईल असेही ते म्हणाले.

पर्यटकांबरेबरच गणेशभक्तांना खड्यांचा त्रास होऊ नये असा उद्देश यामागे आहे. त्यानुसार ४२० किलोमीटर रस्त्यांच्या कॉंक्रिटी करणाचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात यावे. उर्वरित ४२३ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या कामाच्या निविदा मार्चमध्ये काढण्यात याव्यात जेणे करून पुढील दोन महिन्यात मुंबई खड्डेमुक्त होऊ शकेल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी संगितले. खड्डे बुजवण्यासाठी नवीन तंत्रज्ञाना वापर करण्यात येईल . शोष खड्डे करण्याची तसेच जमिनीमध्ये पाणी मुरेल यासाठी उपाययोजना करण्यात येतील. रस्त्याच्या कामासाठी पाच हजार कोटी रुपयांचे बजेट असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधी १६ जुलैला रोजी सह्याद्री अतिथीगृहात ठाणे जिल्हा आणि परिसरातील वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात बैठक घेतली होती. त्यावेळीही मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते खड्डे व वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात यावेत. रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी एमएमआरडीए आणि एमएसआरडीसी यांनी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करावी, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रपती कोविंद यांना फेअरवेल डिनर

बजरंग दलाने कॉंग्रेसच्या पक्ष कार्यालयावर लिहिले हज हाऊस

राष्ट्रीय पुरस्काराने वाढवली आणखी दर्जेदार चित्रपट निर्मितीची जबाबदारी

चीनमध्ये बँकिंग संकट; नागरिकांना रोखण्यासाठी बँकांसमोर रणगाडे तैनात

लोकांना दिलासा देण्यासाठी काम करा

‘लोकांना दिलासा देण्यासाठी काम करा’ असे सांगत मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत रस्त्यांवरील खड्डे आणि वाहतूक कोडींच्या उपाय योजनांबाबत एमएमआरडीए आणि एमएसआरडीसी या दोन्ही यंत्रणांनी स्वतंत्र अशा अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली टीम कार्यान्वित कराव्यात. या टीम चोवीस तास खड्डे बुजवण्याचे काम करतील. खड्डे बुजवण्यासाठी दर्जेदार अशी सामुग्री वापरून रेडीमिक्स पद्धतीने भरण्यात यावेत. नियुक्त अधिकाऱ्यांची ही टीम रस्ते कोणत्या यंत्रणेचे हे न पाहता खड्डे भरेल. त्यासाठीचा खर्च संबंधित यंत्रणेकडून घेण्यात यावा. वेळेत आणि चांगल्या पद्धतीने रस्त्यांवरील खड्डे बुजवले जातील, याची काळजी घ्या. वाहतूकीची कोंडी आणि खड्डे यातून लोकांना दिलासा देण्यासाठी काम करा असे निर्देशही या बैठकीत दिले होते.

Exit mobile version