मुंबईत गाड्या ‘टो’ न करण्याचा प्रयोग

मुंबईत गाड्या ‘टो’ न करण्याचा प्रयोग

मुंबईकरांची आता एक चिंता मिटणार आहे. आता मुंबईकरांची गाडी कुणीही टोइंग करून उचलून नेणार नाही आहे. कारण नवनिर्वाचित पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी प्रायोगिक तत्वावर टोइंग बंद करण्याचे ठरवले आहे. त्यासंदर्भात त्यांनी नागरिकांची मते मागवली आहेत.

संजय पांडे यांनी पाच दिवसांपूर्वी मुंबईच्या आयुक्तांचा पदभार स्वीकारला. त्यांनी आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक जाहीर करून सर्व मुंबईकरांना तक्रारी नोंदवण्याचे आवाहन केले होते. त्यांना असंख्य तक्रारी मिळाल्या. त्यातील बहुतांश वाहन टोइंगशी संबंधित होत्या. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर सहा दिवसांसाठी वाहन न उचलण्याचा निर्णय पांडे यांनी घेतला आहे. हा प्रयोग पूर्ण झाल्यावर त्यातून जो निकाल येईल त्यावर पोलीस आयुक्त संजय पांडे निर्णय घेणार आहेत.

मुंबईकरांची वाहने शनिवारपासून पुढील सहा दिवस टोइंग होणार नाहीत. याची माहिती ट्विटद्वारे मुंबईचे नवे पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी वाहनधारकांना दिली आहे. हा नवा निर्णय ११ मार्चपर्यंत लागू असणार आहे. टोइंग करताना वाहनाचे मोठे नुकसान होते. त्याच्या भरपाईच्या मुद्द्यावरूनही वाहतूक पोलिस आणि वाहनचालकांमध्ये अनेकदा वादावादी होत असल्याचा मुद्दाही तक्रारीत उपस्थित करण्यात आला होता.

हे ही वाचा:

भारतीय महिलांनी पाकिस्तानला नमवून केली वर्ल्डकपची दमदार सुरुवात

झेलेन्स्की हिटलिस्टवर

रशियाला युद्ध ‘महाग’ पडेल?

भारतीय महिलांनी पाकिस्तानला नमवून केली वर्ल्डकपची दमदार सुरुवात

गेल्या महिन्यात वाहन टोइंग करण्याचा दंड वाढवण्यात आला होता. सध्या टोइंग केल्यास दुचाकीसाठी ७३६ रुपये आणि चारचाकीसाठी ९७२ रुपये दंड आकारला जातो. दंडाची रक्कम वाढवण्यापेक्षा आम्हाला पार्किंगची व्यवस्था करून द्या, अशी बहुतांश वाहनचालकांची मागणी आहे. याआधी दुचाकीसाठी ३६४ रुपये आणि चारचाकीसाठी ७३४ रुपये दंड आकारला जात होता

Exit mobile version