30 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरविशेषमुंबईत आता दिसणार लाल-पांढरे झेब्रा क्रॉसिंग

मुंबईत आता दिसणार लाल-पांढरे झेब्रा क्रॉसिंग

Google News Follow

Related

मुंबई शहरात प्रथमच दोन झेब्रा क्रॉसिंगचा रंग बदलून लाल आणि पांढरा करण्यात आला आहे. एमएमआरडीएने या आठवड्यात त्यांच्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील कार्यालयाजवळच्या रस्त्यांवर झेब्रा क्रॉसिंगचा रंग बदलत नव्या रंगाच्या झेब्रा क्रोससिंगची ओळख करून दिली आहे.

झेब्राक्रोससिंग गडद दिसण्यासाठी लखनौ आणि नाशिकसह इतर काही शहरांमध्ये क्रॉसिंगचे हे रंग मोठ्या प्रमाणावर वापरले गेले आहेत. मुंबईत असाच एक उपक्रम राबवला आहे. इंडियन रोड काँग्रेस (IRC) कलर कोड मार्गदर्शक तत्त्वांनुसार हे रंग वापरण्यात आले आहेत. आयआरसीच्या म्हणण्यानुसार, ज्या भागांत जास्त गर्दी असते, कोणत्याही ठिकाणी वाहनांच्या पार्किंगमुळे रहदारी होऊ शकते किंवा कॉर्पोरेट भागात वाहनांची जास्त वर्दळ होत असेल, तर अशावेळी कलर कोड ३५ च्या अंतर्गत लाल रंगाचा वापर करण्यास परवानगी आहे.

हे ही वाचा:

रुपेरी पडद्यावर पुन्हा चालणार राजामौलीची जादू! ‘आर आर आर’ च्या ट्रेलरचा धुमाकूळ

‘महाविकास आघाडी सरकार आता अधिकृतरित्या वसुलीचे सरकार म्हणून मान्यताप्राप्त झालेले आहे’

‘संजय राऊत यांच्या जिभेचे संशोधन करायला हवे’

महापौरांना धमकीचे पत्र; असे धमकीचे पत्र मिळणे ही गंभीर बाब भातखळकरांची प्रतिक्रिया

त्यानुसार बीकेसी हे कॉर्पोरेट क्षेत्र आहे. सरकारी कार्यालयांच्या व्यतिरिक्त, तिथे अनेक बँका आणि खाजगी कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. त्यामुळे इथे वर्दळीचे रस्ते आहेत. आयआरसीचे उपसंचालक (तांत्रिक) राहुल पाटील म्हणाले की, ” गेल्या काही वर्षांत लाल रंगाचा वापर झेब्रा क्रॉसिंगवर होत आहे. आयआरसी कोड ३५ नुसार, त्या भागातील रहदारीनुसार झेब्रा क्रॉसिंगला लाल रंग दिला जाऊ शकतो.” डांबरी रस्त्यांवर पांढरे आणि काळे रंग दिसत असले तरी, सिमेंटच्या रस्त्यांवर ते रंग फारसे नीट दिसत नाहीत.

एमएमआरडीएच्या म्हणण्यानुसार, बीकेसी रस्त्यावरील लाल आणि पांढर्‍या रंगाच्या झेब्रा क्रॉसिंगचे रंग दोन वर्षांपर्यंत राहू शकतात. परंतु ,भारतीय रस्त्यांची परिस्थिती पाहता ते एक वर्ष असू शकते. मात्र या नवीन रंगांच्या वापरामुळे किती फरक पडेल ही येणारी वेळच सांगू शकेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा